CoronaVirus News: धोका वाढला! राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद; जुना विक्रम मोडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 09:06 PM2020-07-30T21:06:00+5:302020-07-30T21:06:34+5:30

दिवसभरात ११ हजार १४७ रुग्ण, तर २६६ मृत्यू; १ लाख ४८ हजार १५० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू

CoronaVirus highest one day spike in number of corona patients in maharashtra | CoronaVirus News: धोका वाढला! राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद; जुना विक्रम मोडीत

CoronaVirus News: धोका वाढला! राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद; जुना विक्रम मोडीत

Next

मुंबई – राज्यात दिवसभरात तब्बल ११ हजार १४७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर २६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंतची ही सर्वाधिक दैनंदिन रुग्ण नोंद आहे. राज्यात सध्या १ लाख ४८ हजार १५० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकीकडे राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के आहे, तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४ लाख ११ हजार ७९८ असून बळींचा आकडा १४ हजार ७२९ झाला आहे. दिवसभरात ८ हजार ८६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत २ लाख ४८ हजार ६१५ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या २६६ मृत्यूंमध्ये मुंबई ५३, ठाणे मनपा ६, नवी मुंबई मनपा १०, कल्याण डोंबिवली मनपा ६, उल्हासनगर मनपा ४, मीरा भाईंदर मनपा ४, वसई विरार मनपा ५, रायगड ६, पनवेल २, नाशिक २, नाशिक मनपा ७, अहमदनगर ४, अहमदनगर मनपा ३, धुळे मनपा १, जळगाव ७, जळगाव मनपा १, नंदूरबार १, पुणे २१, पुणे मनपा ५२, पिंपरी चिंचवड मनपा १०, सोलापूर ५, सोलापूर मनपा ५, सातारा १०, कोल्हापूर १, कोल्हापूर मनपा २, सांगली २, सांगली मिरज कुपवाड मनपा १, रत्नागिरी ५, औंरगाबाद मनपा ६, परभणी मनपा १, लातूर २, लातूर मनपा २, नांदेड ७, नांदेड मनपा ४, अमरावती मनपा १, बुलढाणा १, वाशिम १, नागपूर मनपा २ या रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत दिवसभरात १ हजार २०८ रुग्ण व ५३ मृत्यू झाले आहेत. परिणामी शहर उपनगरात कोरोना बाधितांची संख्या १ लाख १३ हजार १९९ असून मृतांचा आकडा ६ हजार ३०० झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ८६ हजार ४४७ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या २० हजार १५८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईच्या तुलनेत ठाणे, पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. ठाण्यात ३१ हजार ९२३ तर पुण्यात ४८ हजार ८१५ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.८९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ४ हजार १४१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत, तर ४० हजार ५४६ व्यक्त संस्थात्मक अलगीकऱणात आहेत.

(गुरुवारी सकाळच्या अहवालानुसार आकडेवारी)
वयोगट       बाधित रुग्ण   टक्केवारी
० ते १०           १५५०१        ३.९७
११ ते २०         २७१३६       ६.९५
२१ ते ३०        ६८८९७      १७.६४
३१ ते ४०        ८०८०४       २०.६९
४१ ते ५०       ६९७०२       १७.८५
५१ ते ६०       ६४५७८       १६.५३
६१ ते ७०       ४०२९२       १०.३२
७१ ते ८०       १७९५२       ४.६०
८१ ते ९०         ५१०४        १.३१
९१ ते १००        ६१९          ०.१६
१०० ते ११०        १             ०.००

Web Title: CoronaVirus highest one day spike in number of corona patients in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.