Coronavirus : हॉटेल, बारही बंद करा; सर्वपक्षीय नेत्यांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 03:41 PM2020-03-15T15:41:32+5:302020-03-15T15:56:21+5:30

कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरण्याची भिती असल्याने शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा अमलात आणला आहे.

Coronavirus : Hotel, even close the bar; Demands by all-party leaders | Coronavirus : हॉटेल, बारही बंद करा; सर्वपक्षीय नेत्यांनी केली मागणी

Coronavirus : हॉटेल, बारही बंद करा; सर्वपक्षीय नेत्यांनी केली मागणी

Next

मीरारोड - कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने शाळा, मॉल, सभागृह, चित्रपटगृह, व्यायामशाळा, तरण तलाव, सर्व प्रकारचे जाहीर कार्यक्रम आदी बंद केले असताना बार व हॉटेल मात्र सुरू ठेवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बार व हॉटेलांमध्ये मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी पाहता त्यांना सुद्धा बंद केले गेले पाहिजे, अशी मागणी आता करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरण्याची भीती असल्याने शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा अमलात आणला आहे. खबरदारी म्हणून शासनाने शाळा, मॉल, सभागृह, चित्रपटगृह, व्यायामशाळा, तरण तलाव, सर्व प्रकारचे जाहीर कार्यक्रम आदींवर बंदी आणलेली आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे आणि खबरदारी घेणे अपरिहार्य असल्याने या बंदीबाबत फारशी कोणाची तक्रार वा नाराजी देखील नाही. निश्चितच यातून रोजगारीचा प्रश्न गंभीर बनणार आहे.

बार आणि हॉटेलांमध्ये देखील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तेथे तर लोक जवळ जवळ खेटून बसत असतात. त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची खबरदारी वा काळजी घेतली जात नाही. अशा बार व हॉटेलांमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी असते. त्यामुळे बार व हॉटेलांमधून देखील कोरोनाचा संसर्ग पसरू शकत असल्याची भीती आहे.

शाळा, व्यायामशाळा, मॉल, सभागृह , चित्रपटगृह आदींना लागू केलेली बंदी बार व हॉटेलांना देखील लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सरिता नाईक, कृष्णा गुप्ता सह भाजपाचे कमलाकर घरत, मनसेचे हेमंत सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोर्णिमा काटकर, शिवसेनेच्या वेदाली परळकर आदींनी केली आहे. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पार्सल पद्धतीवर भर द्यावा, अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.

Web Title: Coronavirus : Hotel, even close the bar; Demands by all-party leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.