Coronavirus in Maharashtra : कोरोनाने वाढवली चिंता; महाराष्ट्रात 186% रुग्णवाढ, 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 07:56 PM2023-04-04T19:56:20+5:302023-04-04T19:56:38+5:30

Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या नवीन रुग्णांमुळे झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

Coronavirus in Maharashtra : Corona has raised concern; 186% increase in cases in Maharashtra, 4 patients died in 24 hours | Coronavirus in Maharashtra : कोरोनाने वाढवली चिंता; महाराष्ट्रात 186% रुग्णवाढ, 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus in Maharashtra : कोरोनाने वाढवली चिंता; महाराष्ट्रात 186% रुग्णवाढ, 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू

googlenewsNext

Coronavirus in Maharashtra:महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या नवीन रुग्णांमुळे झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाच्या 711 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ही दिवसातील 186 टक्क्यांची वाढ आहे. त्याचबरोबर चार जणांना (सातारा-2, पुणे-1, रत्नागिरी-1) कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्यात सोमवारी एकूण 248 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या सात दिवसांत 11 मृत्यू झाले असून राज्यातील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण सध्या 1.82 टक्के आहे. एका आठवड्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 62 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात सध्या 3792 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांबाबत राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असल्याने घाबरण्याची गरज नाही. राज्यात सुमारे 3,500 सक्रिय प्रकरणे आहेत. परंतु रुग्ण बरा होण्याचे प्रमाण जवळपास 98% आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, 3 एप्रिल रोजी मुंबईत 1,079 सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली, तर सहा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह दर 10% पेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे, कोरोना उद्रेकाच्या सुरुवातीला त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईत झाला होता. 

यावेळी सावंत यांनी नागरिकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लोक विविध ठिकाणी जातात. अनेक गावांमध्ये या कालावधीत जत्राही भरते. अशा परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पण, कोरोना नियमांचे पालन केल्यावर काळजी करण्याची काहीच गरज नाही.

Web Title: Coronavirus in Maharashtra : Corona has raised concern; 186% increase in cases in Maharashtra, 4 patients died in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.