Coronavirus In Maharashtra : राज्यात मास्कमुक्ती होणार का?; आरोग्य विभाग अधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 05:16 AM2022-02-20T05:16:50+5:302022-02-20T05:17:32+5:30

आता मास्कमुक्ती कधी मिळणार? या विचाराने सर्वच जण चिंतेत आहेत. 

Coronavirus In Maharashtra Will there be mask free in the maharashtra Health department officials made it clears | Coronavirus In Maharashtra : राज्यात मास्कमुक्ती होणार का?; आरोग्य विभाग अधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट

Coronavirus In Maharashtra : राज्यात मास्कमुक्ती होणार का?; आरोग्य विभाग अधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट

googlenewsNext

मुंबई : कोरोनाच्या तिन्ही लाटांवर नियंत्रण मिळविण्यात राज्य शासनासह स्थानिक यंत्रणांना यश आले आहे. त्यानंतर आता राज्य वेगवेगळ्या निर्बंधातून मुक्तही होत आहे. अशा स्थितीत आता मास्कमुक्ती कधी मिळणार? या विचाराने सर्वच जण चिंतेत आहेत. 

सामान्य नागरिकांमध्ये कोरोनाविषयीचे गांभीर्यही निघून गेल्याने अनेक जण मास्क घालण्याविषयी बेफिकिरी दाखवितात, मात्र आता राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी मास्क मुक्तीच्या चर्चांना विराम दिला असून मास्कमुक्ती होणार नसल्याचे सूतोवाच केले आहे. मास्कमुक्तीबाबत राज्याच्या कोविडविषयक कृती दलाने विज्ञाननिष्ठ अभ्यासाच्याआधारे अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी दिली.

मास्कमुळे आजार नियंत्रित

  • मास्कच्या दैनंदिन वापरामुळे प्रदूषण, धूळ, धुरके यांमुळे होणाऱ्या श्वसनविकारांचे प्रमाण निश्चित कमी होईल, अशी माहिती श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. कमल सबनीस यांनी दिली. 
  • त्यामुळे कोरोनानंतरही निरोगी जीवनशैलीचा अविभाज्य घटक म्हणून मास्कचा वापर केला पाहिजे. 
  • याविषयी वैद्यकीय क्षेत्रातूनही हेच निरीक्षण वेळोवेळी मांडण्यात आले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Coronavirus In Maharashtra Will there be mask free in the maharashtra Health department officials made it clears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.