Coronavirus जनता कर्फ्युवर इंदोरीकर महाराज बोललेच; म्हणाले ‘मी घरीच आहे’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 10:51 PM2020-03-21T22:51:06+5:302020-03-21T23:06:19+5:30

उद्या हजारो रेल्वे, विमाने आणि देश बंद ठेवण्यात येणार आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

Coronavirus Indurikar maharaj spoke on janata Curfew; Said 'I'm at home' hrb | Coronavirus जनता कर्फ्युवर इंदोरीकर महाराज बोललेच; म्हणाले ‘मी घरीच आहे’

Coronavirus जनता कर्फ्युवर इंदोरीकर महाराज बोललेच; म्हणाले ‘मी घरीच आहे’

Next

मुंबई: देशावर कोरोनाच्या संकटाचे ढग दाटू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या, रविवारी जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. यामुळे उद्या हजारो रेल्वे, विमाने आणि देश बंद ठेवण्यात येणार आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. यावर इंदोरीकर महाराजांनी मत मांडले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना थोपविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यामुळे सर्वांनी त्यांना सहकार्य करावे. आपले गावस शहर, देश या व्हायरसपासून दूर ठेवायचा असेल तर एकट्या दुकट्याने लढून चालणार नाही. प्रशासनही अपुरे पडणार आहे. आता सारी भिस्त सामान्यांवर असल्याचे इंदोरीकर महाराजांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

राज्यात ६३ जणांना कोरोना झाला आहे. जर कोरोनाला गावापासून लांब ठेवायचे असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी. ती गरजेचीच आहे. सर्वांचा लढा आहे तेव्हा सर्वांनी खबरदारी घ्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. घराबाहेर पडू नका, प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, असे आवाहन करताना आपले ३१ मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मी घरीच आहे, तुम्हीही घरीच थांबा, बाहेर जाऊ नका असे आवाहन त्यांनी केले आहे.

पुन्हा शेअर कॅब? पुण्याची महिला वाशीला लग्नासाठी गेलेली; कोरोना पॉझिटिव्ह आढळली

देशभरात रुग्णांची संख्या ३०० पार; मोदींनी व्यक्त केली मोठी भीती

उद्या देशभरात 'जनता कर्फ्यू'; जाणून घ्या काय बंद, काय सुरू

गावाकडे निघालेल्या लाखो नागरिकांना पंतप्रधानांचा महत्त्वाचा संदेश; म्हणाले...

 

Web Title: Coronavirus Indurikar maharaj spoke on janata Curfew; Said 'I'm at home' hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.