coronavirus : आरोग्याशी निगडीत साहित्य पुरवण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 01:44 PM2020-03-25T13:44:27+5:302020-03-25T13:45:26+5:30

संकटप्रसंगी  सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाला आरोग्य विषयक वस्तुंची आवश्यकता असून अशा वस्तुंची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी सॅनिटायझर,  मास्क, व्हेंटीलेटर्स, नेब्युलायझर्स यासह इतर आवश्यक वस्तुंचा शासनास पुरवठा करावा, असे आवाहन देसाई यांनी केले. 

coronavirus: Industries must come forward to supply health-related materials - subhash desai BKP | coronavirus : आरोग्याशी निगडीत साहित्य पुरवण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे

coronavirus : आरोग्याशी निगडीत साहित्य पुरवण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे

Next

मुंबई -  देशावर कुठलेही संकट आल्यास उद्योग क्षेत्र नेहमीच मदतीसाठी पुढे येते. सध्या देशावर कोरोनाचे संकट उभे असून यावर मात करण्यासाठी उद्योगांनी आरोग्याशी निगडीत साधन-सामुग्रीचा शासनाला पुरवठा करावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

 कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह देशात संचारबंदी जारी करण्यात आलेली असून यामुळे अनेक उद्योग ठप्प झाले आहेत. पंरतु अत्यावश्यक सेवा म्हणून काही उद्योगांना सवलती देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अत्यावश्यक वस्तुनिर्मितीसह माहिती तंत्रज्ञान व अनुषांगिक सेवा, कृषी व अन्न प्रक्रिया आधारित उद्योग,  दाळ व राईस मिल,  डेअरी उद्योग,  खाद्य व पशुखाद्य उद्योग यांचा समावेश आहे. अशा संकटप्रसंगी  सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाला आरोग्य विषयक वस्तुंची आवश्यकता असून अशा वस्तुंची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी सॅनिटायझर,  मास्क, व्हेंटीलेटर्स, नेब्युलायझर्स यासह इतर आवश्यक वस्तुंचा शासनास पुरवठा करावा, असे आवाहन देसाई यांनी केले. 

  यासाठी समन्वयक म्हणून मराठी  भाषा सचिव प्राजक्ता लवंगारे  (sec.marathi@maharashtra.gov.in) याशिवाय  उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी (psec.industry@maharashtra.gov.in), उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे (didci@maharashtra.gov.in), एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन (ceo@maharashtra.gov.in), मंत्रालयात सुरु करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातील समन्वयक प्रधान सचिव भूषण गगराणी (ccrmaharashtra.aid@maharashtra.gov.in), अन्न व औषध प्रशासनाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी (psec.mededu@maharashtra.gov.in) यांच्याशी संपर्क करावा, असेही श्री. देसाई यांनी सांगितले आहे.

Web Title: coronavirus: Industries must come forward to supply health-related materials - subhash desai BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.