Coronavirus: राज्यातील एका आमदाराच्या आई-वडिलांसह कुटुंबातील ६ जणांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 10:58 PM2020-08-02T22:58:24+5:302020-08-02T22:58:48+5:30
यापूर्वी धनजंय मुंडे, अशोक चव्हाण, शंकरराव गडाख, जितेंद्र आव्हाड, आमदार गीता जैन यांच्यासह अनेक नेत्यांना कोरोना झाला होता, त्यातून या नेत्यांनी कोरोनावर मात करत पुन्हा मदतकार्यात उतरले आहेत.
अमरावती – सध्या कोरोनाचा विळखा वाढत असून आज राज्यात दिवसभरात ९ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ४० हजाराहून जास्त झाली आहे. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
जिल्ह्यातील एका आमदाराच्या आई-वडिलांसह कुटुंबातील सहा जण कोरोना संक्रमित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये आमदारांची बहीण, जावई, भाचा, पुतण्या यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. आमदारांचा आरटी-पीसीआर चाचणी अहवाल प्रलंबित आहे.
यापूर्वी धनजंय मुंडे, अशोक चव्हाण, शंकरराव गडाख, जितेंद्र आव्हाड, आमदार गीता जैन यांच्यासह अनेक नेत्यांना कोरोना झाला होता, त्यातून या नेत्यांनी कोरोनावर मात करत पुन्हा मदतकार्यात उतरले आहेत.