CoronaVirus: सॅल्यूट! चिमुकलीला घरी ठेऊन आईची रुग्णसेवा; एक किडनी बहिणीला दान करुनही कर्तव्य निभावतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 03:56 PM2021-05-26T15:56:34+5:302021-05-26T15:56:44+5:30

CoronaVirus: प्रतिकूल परस्थिती असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकऱ्याची नोकरी स्वीकारुन सेवा देणारे अनेक डॉक्टर देवदूतापेक्षा कमी नाहीत.

coronavirus karad doctor jayashree desai medical aid in malkapur | CoronaVirus: सॅल्यूट! चिमुकलीला घरी ठेऊन आईची रुग्णसेवा; एक किडनी बहिणीला दान करुनही कर्तव्य निभावतेय

CoronaVirus: सॅल्यूट! चिमुकलीला घरी ठेऊन आईची रुग्णसेवा; एक किडनी बहिणीला दान करुनही कर्तव्य निभावतेय

Next

सातारा: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्यापही पूर्णपणे ओसरलेला दिसत नाही. नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट वाढला असला, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू चिंता वाढवणारे ठरत आहेत. कोरोना काळात माणसे पैशांसाठी काहीही करतात, असा डॉक्टरांविषयी सर्वसामान्यांचा समज झाला आहे. मात्र, प्रतिकूल परस्थिती असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकऱ्याची नोकरी स्वीकारुन सेवा देणारे अनेक डॉक्टर देवदूतापेक्षा कमी नाहीत. यापैकी एक नाव म्हणजे डॉ. जयश्री देसाई. (coronavirus karad doctor jayashree desai medical aid in malkapur)

प्रशांत देसाई आणि जयश्री देसाई हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. डॉ. प्रशांत देसाई वाई येथे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून, डॉ. जयश्री देसाई यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्ष खाजगी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. मध्यल्या कालावधीत आपली एक किडनी बहिणीला दान केल्यानंतर त्या घरीच होत्या. मात्र, एप्रिल २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपण आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी करावा, अशी इच्छा त्यांच्या मनात आली. डॉ. प्रशांत देसाई यांनी जयश्री यांची जबरदस्त इच्छाशक्ती पाहून त्यांना संमती दर्शवली.

ऐकावं ते नवलच! संकटापासून बचावासाठी थेट कोरोना देवीची स्थापना; धोका कमी होत असल्याचा दावा

लहान मुलीला घरातच ठेवून रुग्णसेवा

यासंदर्भात टीव्ही ९ ने वृत्त दिले आहे. कोरोना काळात जयश्री यांना स्वतःबरोबर कौटुंबिक समस्यांनाही तोंड द्यावे लागले. संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असताना घरी सात वर्षांची लहान मुलगी. तिला सांभाळण्यासाठी कोणी नव्हते. डॉ. प्रशांत देसाई यांची वाई येथे नोकरी, मोठा मुलगा निवासी शाळेत हॉस्टेलमध्ये. कामावर मुलीला घेऊन जाणे शक्य नाही, शेजाऱ्यांकडे ठेवून जाणेही शक्य नव्हते. म्हणून देसाईंनी घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. मुलीला घरात ठेवून बाहेरुन कुलूप घालून जयश्री देसाई अखंडपणे रुग्णसेवा करत राहिल्या. घरातील सीसीटीव्हीचा ॲक्सेस मोबाईलवर घेऊन पती पत्नी दोघेही घरात एकट्या असणाऱ्या मुलीवर लक्ष ठेऊन काम करत होते. 

निसर्ग संकटात आहे; त्याचा आदर करा हीच तर गौतम बुद्धांची शिकवण: पंतप्रधान मोदी

कोव्हिड योद्धा म्हणून कामाचा गौरव

डॉ. जयश्री यांनी मलकापूर शहरात आरोग्य जनजागृतीचे काम सतत सुरू ठेवले आहे. पहिल्या कोरोना लाटेतील कामाची पोचपावती म्हणून त्यांना मान्यवरांच्या हस्ते कोव्हिडयोद्धा म्हणून गौरवण्यात आले आहे. या कालावधीत डॉ. जयश्री यांना आपले पती प्रशांत देसाई यांची खंबीर साथ लाभली. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत काम करुनही डॉ जयश्री देसाई समाधानी आहेत. कोरोना हॉटस्पॉटमध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे यशस्वी काम करता आल्याचे त्या नम्रपणे मान्य करतात.
 

Read in English

Web Title: coronavirus karad doctor jayashree desai medical aid in malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.