CoroanaVirus : चौथ्या लाटेचा धोका वाढतोय! राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग वाढला, 24 तासांत 2,813 नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 10:43 PM2022-06-09T22:43:26+5:302022-06-09T22:45:02+5:30

सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत तब्बल 79,01,628 एवढे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 1,47,867 जणांचा मृत्यू झाला आहे.

CoronaVirus latest news 2813 new cases reported in maharashtra in last 24 hours know about the nation | CoroanaVirus : चौथ्या लाटेचा धोका वाढतोय! राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग वाढला, 24 तासांत 2,813 नवे रुग्ण

संग्रहित छायाचित्र.

Next

मुंबई - राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गुरुवारी, राज्यभरात कोरोनाचे 2,813 नवे रुग्ण समोर आले आहेत. ही गेल्या सुमारे चार महिन्यांत एका दिवसात नोंदवली गेलेली सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. तर, गेल्या चोवीस तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. (Corona in Maharashtra)

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11,571 वर पोहोचली आहे. तर नव्या रुग्णसंख्येत एकट्या मुंबईत 1,702 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज राज्यातील एकमेव मृत्यूची नोंदही मुंबईतच झाली आहे. गेल्या 15 फेब्रुवारी रोजी आढळलेल्या 2,831 कोरोना रुग्णांनंतर, राज्यात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत तब्बल 79,01,628 एवढे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 1,47,867 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात बुधवारीही 2,701 एवढ्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. मुंबईत बुधवारी कोरोनाचे 1,765 नवे रुग्ण समोर आले होते. 26 जानेवारीनंतरची ही एका दिवासांत समोर आलेली सर्वाधिक रुग्ण संख्या होती.

अशी आहे देशाची स्थिती-
देशाचा विचार करता, देशात गुरूवारी 99 दिवसांनंतर 7000 हून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत तब्बल 7,240 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यानंतर एकूण कोरोना बाधितांचा आकडा, आता 4,31,97,522 वर पोहोचला आहे. तर आठ रुग्णांच्या मृत्यूनंतर, आता एकूण मृतांचा आकडा 5,24,723 वर पोहोचला आहे.

Web Title: CoronaVirus latest news 2813 new cases reported in maharashtra in last 24 hours know about the nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.