CoronaVirus Live Updates : राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,672 नवे रुग्ण, 594 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 09:17 PM2021-05-23T21:17:35+5:302021-05-23T21:20:47+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 55,79,897 वर गेली आहे. 

CoronaVirus Live Updates Maharashtra reports 26,672 new cases and 594 deaths in last 24 hours | CoronaVirus Live Updates : राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,672 नवे रुग्ण, 594 जणांचा मृत्यू 

CoronaVirus Live Updates : राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,672 नवे रुग्ण, 594 जणांचा मृत्यू 

Next

मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटीचा टप्पा पार केला असून दोन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,65,30,132 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,40,842 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,741 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,99,266 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच कोरोनाग्रस्तांचा आकडा 55 लाखांवर पोहोचला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 55,79,897 वर गेली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी (23 मे) कोरोनाचे 26,672 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 594 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 55,79,897 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा देखील वाढला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत आहे. याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 29,177 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 326 दिवसांवर

मुंबईत शनिवारीही रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. शहर उपनगरात 1 हजार 827 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 6 लाख 51 हजार 216 रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. त्यामुळे मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर 93 टक्क्यांवर पोहोचला  आहे. सध्या 28 हजार 508 रुग्ण उपचाराधीन आहेत. शहर उपनगरात दिवसभरात 1299 रुग्ण आणि 52 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आता मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6 लाख 96 हजार 379 झाली आहे, तर मृतांचा एकूण आकडा 14 हजार 574 झाला आहे. 15 ते 21 मेपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.21 टक्के असल्याची नोंद आहे.  

Web Title: CoronaVirus Live Updates Maharashtra reports 26,672 new cases and 594 deaths in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.