CoronaVirus Live Updates : धोका वाढला! महाराष्ट्रात 58,993 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 32,88,540 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 09:01 PM2021-04-09T21:01:33+5:302021-04-09T21:08:25+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 लाखांवर पोहोचला आहे.
मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले आहेत. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल एक कोटीवर पोहोचली असून दीड लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. केंद्राने उच्च स्तरीय 50 वैद्यकीय टीम तयार केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी टीम राज्यांना सहकार्य आणि मदत करतील. यामध्ये 30 टीम महाराष्ट्र, 11 टीम छत्तीसगड आणि 9 टीम या पंजाबमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहेत. याच दरम्यान महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 लाखांवर पोहोचला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 32,88,540 वर गेली आहे. राज्यात शुक्रवारी (9 एप्रिल) कोरोनाचे 58,993 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 301 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32,88,540 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा देखील वाढला आहे. कोरोनामुळे राज्यात 57,329 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 26,95,148 जण कोरोनातून बरे झाले आहेत. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
Maharashtra reports 58,993 new COVID cases, 45,391 recoveries, and 301 deaths in the last 24 hours
— ANI (@ANI) April 9, 2021
Total cases: 32,88,540
Active cases: 5,34,603
Total recoveries: 26,95,148
Death toll: 57,329 pic.twitter.com/rwiRma3yua
राज्यात वीकेंड लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर; जाणून घ्या, काय सुरू अन् काय बंद?
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. याबाबतच्या गाईडलाईन्स राज्य सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत. राज्यात वेगाने लसीकरण सुरू आहे. ज्यांचं लसीकरण झालेलं नसेल त्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्या होत्या. तिथे आता पर्याय म्हणून रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे.10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आपले सरकार सेवा केंद्र, पासपोर्ट सेवा, सेतू केंद्र आठवड्यात सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहू शकतात. वृत्तपत्रांमध्ये मासिके, नियतकालिके, जर्नल्स यांचा देखील आवश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे.
जाणून घ्या, वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार?
- कोणतही ठिकाण जे अत्यावश्यक वस्तू विकत असेल ते 4 आणि 5 एप्रिलला सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत कोरोनाच्या कडक निर्बंधांसह सुरू राहणार आहे.
- अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. कोणीही व्यक्ती महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही.
- कोरोना नियमांचं पालन करत एपीएमसी मार्केट सुरू राहणार. मात्र जर स्थानिक प्रशासनाला वाटलं की नियमांचं उल्लंघन होत आहे तर ते राज्य सरकारकडून परवानगी घेऊन मार्केट बंद करू शकतात.
- बांधकामासाठी वस्तू पुरवणारी दुकानं बंद राहतील.
- गॅरेज सुरू राहतील.
- ढाबे सुरू असतील मात्र तिथे देखील टेक अवे होम आणि होम डिलीव्हरी पर्याय उपलब्ध असेल.
- 4 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार नागरीक दारू होम डिलिव्हरी पद्धतीनं खरेदी करू शकतात. मात्र निश्चित करण्यात आलेल्या वेळेतचं दुकानांकडून सेवा दिली जाईल.
- इलेक्ट्रिक उपकरणाचीदुकानं बंद असतील.
- सेतू कार्यालय, नागरीक सेवा केंद्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असतील.
- रेस्टॉरंट आणि बार स्थानिक प्रशासनान लावलेल्या नियमांसह सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत फक्त पार्सल सुविधेसह सुरू असतील.
CoronaVirus Live Updates : आता आरटीपीसीआर ऐवजी रॅपिड अँटिजेन टेस्टला परवानगीhttps://t.co/RpOjtj2HR9#CoronavirusIndia#coronavirus#coronainmaharashtra#MaharashtraFightsCorona#WeekendLockdown#maharastra
— Lokmat (@MiLOKMAT) April 9, 2021