CoronaVirus Live Updates : संभाव्य तिसरा लाटेसाठी नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व महापालिका आयुक्तांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 09:25 PM2021-05-01T21:25:49+5:302021-05-01T21:27:51+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : पहिल्या लाटेमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळला. तर दुसऱ्या लाटेत ३० ते ५० वयोगटात प्रमाण जास्त आहे.

CoronaVirus Live Updates: Plan for possible third wave, CM orders all Municipal Commissioners | CoronaVirus Live Updates : संभाव्य तिसरा लाटेसाठी नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व महापालिका आयुक्तांना आदेश

CoronaVirus Live Updates : संभाव्य तिसरा लाटेसाठी नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व महापालिका आयुक्तांना आदेश

Next

मुंबई - तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणावर कोरोना होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत आगाऊ नियोजन करावे, तसेच ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आढावा बैठकीत मुंबई महानगर, पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा सर्व पालिका आयुक्तांना ठणकावले.  दुरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत, संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, विविध पालिका अधिकारी उपस्थित होते.

पहिल्या लाटेमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळला. तर दुसऱ्या लाटेत ३० ते ५० वयोगटात प्रमाण जास्त आहे. लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत असल्याने तिसऱ्या लाटेत हे प्रमाण आणखी वाढले तर आपली पूर्ण व्यवस्था हवी. त्याचे नियोजन करून ठेवा व रुग्णालयांतील लहान मुलांचे उपचार कक्ष सुसज्ज ठेवा, असेही त्यांनी सांगितले.

होम क्वारंटाइन रुग्णांसाठी स्वतंत्र यंत्रणा...

सौम्य लक्षणांच्या होम क्वारंटाइन रुग्णांना नेमके कधी रुग्णालयांत हलवावे, जेणेकरून वेळीच योग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील त्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करून ज्येष्ठ व निवृत्त डॉक्टर्सकडे रुग्णांच्या संपर्काची जबाबदारी द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री यावेळी केली.

ऑक्सिजन, औषधांचा साठा ठेवा...

सध्या बऱ्याच ठिकाणी रुग्ण संख्या स्थिरावलेली दिसते. मात्र धोका टळलेला नाही. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑक्सिजनसाठी प्रत्येक पालिका आत्मनिर्भर झालीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजनसाठी इतर कुणावरही अवलंबून राहू नये. औषधांचा साठा, व्हेंटिलेटर पुरेशा संख्येने असल्याची खात्री करून घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

अग्निसुरक्षा आवश्यक....

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी महत्वपूर्ण सूचना केल्या. जम्बो फिल्ड रूग्णालय, शासकीय व खासगी रुग्णालयांचे अग्नि सुरक्षा, बांधकाम, विद्युत उपकरणाचे सुरक्षा काळजीपूर्वक तपासून घ्या, असे त्यांनी सांगितले.
 

Web Title: CoronaVirus Live Updates: Plan for possible third wave, CM orders all Municipal Commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.