Coronavirus Live updates: संपूर्ण लॉकडाऊन की कठोर निर्बंध? इकडे राज्यात, तिकडे केंद्रात तातडीच्या बैठका; निर्णयाची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 01:01 PM2021-04-04T13:01:40+5:302021-04-04T13:03:02+5:30

Coronavirus Emergency meeting called by CM Uddhav Thackreay: राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या गाईडलाईन आज सायंकाळी जाहीर करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.

Coronavirus Live updates: Total lockdown or strict restrictions? Emergency meetings CM Uddhav thackreay maharashtra, PM Modi in Delhi | Coronavirus Live updates: संपूर्ण लॉकडाऊन की कठोर निर्बंध? इकडे राज्यात, तिकडे केंद्रात तातडीच्या बैठका; निर्णयाची अपेक्षा

Coronavirus Live updates: संपूर्ण लॉकडाऊन की कठोर निर्बंध? इकडे राज्यात, तिकडे केंद्रात तातडीच्या बैठका; निर्णयाची अपेक्षा

googlenewsNext

देशात कोरोनाची मगरमीठी घट्ट होत चालली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 93,249 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 60,048 रुग्ण बरे झाले आहेत. 513 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 5 महिन्यांतील उच्चांक असल्याने आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackreay) आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या हायलेव्हल बैठका (High level meetings) आहेत. यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार की निर्बंध आणखी कठोर केले जाणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (Emergency Cabinate meeting called by CM Uddhav Thackreay and Pm Narendra Modi meeting In Delhi with Chief secretory.)

Corona Vaccination: भन्नाट आयडिया! कोरोना लसीसोबत सोन्याची नथ गिफ्ट; नागरिक मालामाल


राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असून यामध्ये आज सायंकाळी नव्या गाईडलाईन ठरविण्य़ात येणार असल्याचे समजते. या गाईडलाईन आज सायंकाळी जाहीर करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील प्रसारमाध्यमांच्या संपादकांशी बोलताना आता लॉकडाऊन करण्याची वेळ आल्याचे सांगितले होते. हळूहळू निर्बंध लादून लोक ऐकत नाहीत. यामुळे आधी संपूर्ण लॉकडाऊन आणि नंतर हळूहळू सूट देण्याची योजना असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत. 


पुण्यात आधीच मिनी लॉकडाऊन (Mini Lockdown in Pune) सुरु झाला आहे. तसाच मुंबईतही सुरु करून उर्वरित राज्यात अन्य नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, पुण्यासारख्या कोरोना विस्फोट झालेल्या जिल्ह्यांसाठी वेगळे नियम आणि जिल्हावार वेगळे निर्बंध असण्याची शक्यता आहे. सत्ताधारी मित्रपक्षांसह विरोधी पक्षांचा संपूर्ण लॉकडाऊनला विरोध आहे. काही पक्षांनी सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर येण्याचा इशारा दिला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर उतरा पण कोरोना निर्मुलनासाठी असे आवाहन केले आहे. 

CoronaVirus Updates: चिंतेत भर! दिवसभरात तब्बल ९३ हजार नवे रुग्ण; देशातील कोरोनाबाधितांचा उच्चांक


दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने दिल्लीत उच्च स्तरिय बैठक बोलावली आहे. यामध्ये सचिवांपासून केंद्रीय मंत्री सहभागी झाले आहेत. यामध्ये वाढत्या कोरोनावर का उपाय योजता येतील, यावर चर्चा होणार आहे. तसेच राज्यांना निर्णय घेता येत नसेल तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काय करता येईल हे देखील पाहिले जाणार आहे. या बैठकीला कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, डॉ. विनोद पॉल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत. 

Web Title: Coronavirus Live updates: Total lockdown or strict restrictions? Emergency meetings CM Uddhav thackreay maharashtra, PM Modi in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.