Coronavirus Live updates: कोरोनाचे ‘राज्य’! ब्राझीलमधील व्हेरिएंटही महाराष्ट्रात आढळला; मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 03:17 AM2021-03-25T03:17:57+5:302021-03-25T03:18:19+5:30

जिनोम सिक्वेन्सिंग व महाराष्ट्रातील नमुने यांच्या विश्लेषणातून कोरोना विषाणूत म्युटेशन झाल्याचे आढळले आहे.

Coronavirus Live updates: A variant from Brazil was also found in Maharashtra | Coronavirus Live updates: कोरोनाचे ‘राज्य’! ब्राझीलमधील व्हेरिएंटही महाराष्ट्रात आढळला; मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

Coronavirus Live updates: कोरोनाचे ‘राज्य’! ब्राझीलमधील व्हेरिएंटही महाराष्ट्रात आढळला; मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

googlenewsNext

मुंबई/नवी दिल्ली : देशासह राज्यात झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर असून देशात सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत टॉप दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात ३१,८५५ नवे कोरोना रुग्ण आढळले असून, त्यात मुंबईतील ५,१८५ बाधितांचा समावेश आहे. राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात ४७ हजार २६२ लोकांना कोरोनाची बाधा झाली तर २७५ जणांचा मृत्यू झाला. ठाणे, पालघर, रायगडसह मुंबई महानगरात ९,१४७ रूग्ण आढळले. एकाच दिवसात एवढे रुग्ण आढळण्याचा हा नवीन वर्षातील नवा उच्चांक आहे. सलग १४व्या दिवशी बाधितांच्या संख्या वाढली आहे. 

देशात नव्या व्हेरिएंटचे ७७१ बाधित
जिनोम सिक्वेन्सिंग व महाराष्ट्रातील नमुने यांच्या विश्लेषणातून कोरोना विषाणूत म्युटेशन झाल्याचे आढळले आहे. सुरुवातीच्या व्हेरिएंट्सपेक्षा हा म्युटेशन झालेला विषाणू वेगळा आहे. देशात कोरोना व्हेरिएंटच्या ७७१ प्रकरणांचा तपास लागला आहे. त्यात ब्रिटनच्या नव्या व्हेरिएंटचे ७३६ बाधित, द. आफ्रिकेच्या व्हेरिएंटचे ३४ आणि ब्राझील व्हेरिएंटचा १ अशा बाधितांचा समावेश आहे.

नांदेड, बीड जिल्ह्यात लॉकडाऊन
नांदेड जिल्ह्यात २५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत कडक लॉकडाऊन. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार या काळात बंद. किराणा दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी. बीड जिल्ह्यात २५ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपासून ४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन. केवळ शासकीय कार्यालये व अत्यावश्यक सेवा सुरू. बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यास वा येण्यास कोरोना टेस्ट बंधनकारक.

परभणीत संपूर्ण संचारबंदी
जिल्ह्यात बुधवारी सायंकाळीपासून १ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी.. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. या काळात इतर सर्व व्यवहारांवर निर्बंध असतील.

मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत
राज्यात सगळीकडे कडक लॉकडाऊन लावण्याबाबतही मंत्रिमंडळात चर्चा झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नसेल या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले.

विषाणूच्या स्वरूपात बदल होणे ही एक सर्वसामान्य बाब आहे. कोरोनाला अटकाव करायचा असेल तर मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे हे अत्यावश्यक आहे. मास्कचा वापर लसीकरणाएवढाच प्रभावी आहे. - व्ही. के. पॉल, 
नीती आयोगाचे सदस्य 

Web Title: Coronavirus Live updates: A variant from Brazil was also found in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.