Coronavirus, Lockdown News: ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये एसटी सुरू होण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 02:22 AM2020-05-04T02:22:42+5:302020-05-04T02:23:17+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी तिसºया टप्प्यातील लॉकडाउन सुरु आहे. यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे
मुंबई : कोरोना बाधित रुग्णांच्या आधारावर सरकारने तीन झोन तयार केले आहे. त्यामध्ये रेड,आँरेंज आणि ग्रीन झोन आहे. यापैकी ३ मेपासून ग्रीन झोन मधील एसटी बस सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. प्रत्येक बस मध्ये ५० टक्के प्रवासी क्षमता असणार आहे. मात्र यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश आणि संमती आवश्यकता आहे.
राज्य सरकारने ३ मेपासून लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना बाधीत रुग्णांच्या आधारावर ठरविलेल्या ग्रीन झोन मधील जिल्ह्यांमध्ये एसटीची शहरांतर्गत सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्या एसटीला जिल्ह्यांच्या बाहेर जाण्यास बंदी राहणार आहे. एसटी प्रवाशांना जिल्ह्यातील कामानिमित्त बाहेर पडता येणार असल्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी तिसºया टप्प्यातील लॉकडाउन सुरु आहे. यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे. परिणामी, किराणा, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होत आहे. काही ठिकाणी जादा किंमतीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू आहे. ग्रीन झोन मध्ये एसटीची सेवा सुरु केल्यास प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.