CoronaVirus Lockdown News: मंदिरे पुन्हा बंद; जोतिबा यात्रा रद्द, पूजा सुरू राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 04:14 AM2021-04-06T04:14:00+5:302021-04-06T04:14:19+5:30
शासनाच्या आदेशानुसार मंदिर बंद ठेवण्यात येणार असली तरी या कालावधीत देवी व मंदिर परिसरातील उपदेवतांच्या दैनंदिन नित्योपचार पूजा या पूर्वापार प्रथेनुसार महंत, पुजारी व मानकऱ्यांच्या हस्ते होत राहतील.
मुंबई : सरकारने रविवारी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूरसह विविध धार्मिक स्थळे सोमवारी रात्रीपासून बंद करण्यात आली.
वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाची यात्रा रद्द करण्यात आल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जाहीर केले. शासनाच्या आदेशानुसार मंदिर बंद ठेवण्यात येणार असली तरी या कालावधीत देवी व मंदिर परिसरातील उपदेवतांच्या दैनंदिन नित्योपचार पूजा या पूर्वापार प्रथेनुसार महंत, पुजारी व मानकऱ्यांच्या हस्ते होत राहतील. तोपर्यंत भाविकांनी तुळजापूरला येण्याचे टाळून ऑनलाइन दर्शन घ्यावे, असे आवाहन तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
नर्सी येथील मिठाची यात्रा रद्द
हिंगोली तालुक्यातील श्रीक्षेत्र नर्सी येथील श्री संत नामदेव महाराज मंदिर परिसरामध्ये भरणारी मिठाची यात्रा यावर्षीसुद्धा कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आली.