…अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल; मंत्री छगन भुजबळांचा सूचक इशारा

By प्रविण मरगळे | Published: February 19, 2021 02:48 PM2021-02-19T14:48:18+5:302021-02-19T14:51:09+5:30

Coronavirus, Lockdown News: शिवजयंती कार्यक्रमानिमित्ताने आज नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी पंचवटी नाशिक येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Coronavirus: lockdown will have to be decided by the government; Minister Chhagan Bhujbal | …अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल; मंत्री छगन भुजबळांचा सूचक इशारा

…अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल; मंत्री छगन भुजबळांचा सूचक इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहेलॉकडाऊन करणे नागरिकांना आणि शासनाला देखील परवडणारे नाहीमास्क आणि सॅनिटायजरचा वापर नियमित केला तरच हे शक्य आहे.

नाशिक – कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या  नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल अशी प्रतिक्रिया नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी दिली.

शिवजयंती कार्यक्रमानिमित्ताने आज नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी पंचवटी नाशिक येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही. लॉकडाऊन करणे नागरिकांना आणि शासनाला देखील परवडणारे नाही. मात्र रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र यावर पुनर्विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात आहे. जर नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले. मास्क आणि सॅनिटायजरचा वापर नियमित केला तरच हे शक्य आहे. अन्यथा शासनाला याचा पुनर्विचार करावा लागणार असल्याचे छगन भुजबळांनी यावेळी म्हटलं.

नाशिकमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत ते म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामध्ये नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनासाठी महिना भराचा कालावधी बाकी आहे. यासाठी काटेकोर पद्धतीने नियोजन करण्यात येत असून साहित्य संमेलनाच्या ठिकाणी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येईल. या कार्यक्रमस्थळी मास्क शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच याठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येऊन गर्दी होणार नाही याचे काटेकोर नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात रुग्णवाढीने चिंता, दिवसभरात ५,४२७ नवीन रुग्णांचे निदान

गुरुवारी ५,४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३८ मृत्यूंची नोंद झाली. बुधवारी ४,७८७ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती व अकोला जिल्ह्यात शनिवार, रविवार असे दोन दिवस संचारबंदी  लागू केली जाणार आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश काढण्यात आला असला तरी प्रत्यक्षात जमावबंदी असेल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Coronavirus: lockdown will have to be decided by the government; Minister Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.