आनंद महिंद्रांनी मुंबईतल्या 'या' जोडप्याला डोनेट केले 4 लाख रुपये; कारण जाणून तूम्हीही कराल त्यांना सलाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 10:32 PM2020-07-30T22:32:00+5:302020-07-30T22:40:39+5:30
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक कुटुंबांवर उपास मारिची वेळ आली आहे. अनेक स्थरांतून अशा कुटुंबांसाठी ...
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक कुटुंबांवर उपास मारिची वेळ आली आहे. अनेक स्थरांतून अशा कुटुंबांसाठी मदतीचे हात पुढे येताना दिसत आहेत. यातच मुंबईत हक्काचे घर व्हावे यासाठी प्रोव्हिडंट फंडात जमाकेले पैसे, एका जोडप्याने, अशी उपासमारीची वेळ आलेल्या लोकांसाठी खर्च केले आहेत. या जोडप्याने आपल्या प्रोव्हिडंट फंडत जमाकेलेल्या पैशांतून एक-दोन नव्हे, तर तब्बल दीड हजार लोकांच्या रेशनिंगची व्यवस्था केली आहे. आता या जोडप्याच्या मदतीसाठी चक्क उद्योगपती आनंद महिंद्राच धावून आले आहेत.
फयाज शेख आणि मिझगा शेख, असे या जोडप्याचे नाव आहे. ते मुंबईतील मालवणी येथे राहतात. या जोडप्याने केलेल्या या कार्यासंदर्भात एका प्रसिद्ध माध्यमाने बातमी छापल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी त्याची दखल घेत त्यांना 4 लाखा रुपयांची मदत केली आहे.
फयाज हे अम्बुजवाडी येथील इंग्रजी शाळेचे विश्वस्त आहेत, तर मिझगा या शाळेच्या मुख्याध्याप म्हणून काम पाहतात. याशिवाय फयाज हे एका खासगी कॉस्मॅटीक कंपनीतही नौकरी करतात. मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनच त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने स्थानिकांना मदत करण्यास सुरुवात केली. चार महिन्यानंतरही त्यांचे हे कार्य सुरूच राहिले. विशेष म्हणजे घरासाठी ठेवलेली प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम काढून त्यांनी गरीबांच्या पोटा-पाण्याची व्यवस्था लावण्यासाठी खर्च केली. विशेष म्हणजे या जोडप्याने, लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना फी भरता येत नसल्याने त्यांची तीन महिन्यांची फीदेखील माफ केली आहे.
या पती-पत्नींसंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त छापल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्याची दखल घेत या जोडप्याला मदतीचा हात दिला. याशिवाय केपीएमजी, टेलिकॉम कंपनी आणि आयटी कंपनीनेही त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे.
मिझगा म्हणाल्या, गरिबांना अन्न धान्या वाटन्याशिवाय आम्ही वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याम्हणाल्या “माझ्या शाळेत शिकणाऱ्या सहापैकी पाच विद्यार्थी दहावीच्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास झाले आहेत. मात्र त्यांच्या पालकांना या मुलांच्या शिक्षणाचा पुढील खर्च उचलणे शक्य होणार नाही. मात्र त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, असे आम्हाला वाटते. यामुळेच आम्ही त्यांच्या ज्युनियर कॉलेजची फी भरण्याचा निर्णय घेतला आहे.”
मिझगा यांनी २०१०मध्ये मालवणी येथे एक बालवाडी सुरू केली होती. यानंतर त्यांनी इंग्रजी शाळाही सुरू केले. या शाळेला अद्याप सरकारची मान्यता मिळालेली नाही. मात्र येथे विद्यार्थांना जवळपास मोफतच शिक्षण दिले जाते.
यासंदर्भात बोलताना फयाज म्हणाले, "वर्तमानपत्रात आमची बातमी आल्यानंतर रेशनची मागणी वाढू लागली आहे. संपूर्ण मुंबईतून आम्हाला फोन येऊ लागले. आम्हाला कोणताही फोन टाळता आला नाही. प्रत्येकाला रेशन देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आर्थिक मदत मिळाल्यानंतर आम्ही आणखीन रेशन आणून लोकांना दिले, हे कार्य आम्हाला थांबवायचे नाही." यावेळी त्यांनी देणगी देणाऱ्यांचेही आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या -
ठाकरे सरकारला इशारा; "बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास आंदोलन करणार"
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे
15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...
Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी