CoronaVirus in Maharashtra: राज्यात 55,411, मुंबईत 9327 नवे कोरोनाबाधित; 309 मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 09:15 PM2021-04-10T21:15:43+5:302021-04-10T21:16:03+5:30
CoronaVirus in Maharashtra: राज्यात आज दिवसभरात 53,005 रुग्ण बरे झाले आहेत. तर 309 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 33,43,951 झाली आहे.
राज्य मोठ्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची संख्या जाहीर झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 55,411 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर एकट्या मुंबईत आजचा आकडा हा 9327 एवढा आहे. (Maharashtra reports 55,411 new #COVID19 cases, 53,005 recoveries and 309 deaths in the last 24 hours)
राज्यात आज दिवसभरात 53,005 रुग्ण बरे झाले आहेत. तर 309 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 33,43,951 झाली आहे. तर मृतांचा आकडा 57,638 वर पोहोचला आहे. राज्यात सध्या 5,36,682 उपचार घेत आहेत.
LockDown: मी आज निर्णय घेतला नाही तर...; लॉकडाऊनवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गंभीर इशारा
तर मुंबईमध्ये 9327 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. 50 जणांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णांचा आकडा 5,10,225 वर गेला आहे. पुणे शहरातील कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने मागील शनिवारपासून कडक निर्बंध जाहीर केले आहे. दिवसा जमावबंदी तर सायंकाळी ६ नंतर कडक संचारबंदी लागू आहे. मात्र, आता त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत ३६ टक्क्यांवर पोहचलेला पॉझिटिव्हिटी रेट आता कमी होऊ लागला आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.
Maharashtra reports 55,411 new #COVID19 cases, 53,005 recoveries and 309 deaths in the last 24 hours
— ANI (@ANI) April 10, 2021
Total cases: 33,43,951
Total recoveries: 27,48,153
Death toll: 57,638
Active cases: 5,36,682 pic.twitter.com/58lLK158BH