Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; ५९१४ रुग्णांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 11:37 PM2021-08-21T23:37:40+5:302021-08-21T23:38:34+5:30

Coronavirus In Maharashtra : चोवीस तासांच ५९१४ जणांनी केली कोरोनावर मात. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ

coronavirus maharashtra 5914 corona patients discharge 4575 new patients found in state | Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; ५९१४ रुग्णांची कोरोनावर मात

Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; ५९१४ रुग्णांची कोरोनावर मात

Next
ठळक मुद्देचोवीस तासांच ५९१४ जणांनी केली कोरोनावर मात.रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची अधिक नोंद करण्यात आली. चोवीस तासांत राज्यात ५९१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे साडेचार हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासांत राज्यात ५९१४ रूग्णांनी कोरोनावर मात केली. तर दुसरीकडे ४५७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये १४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या ५३,९६७ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचा दर ९६.९९ टक्क्यांवर पोहोचला आहे.



मुंबईतही कोरोनामुक्त अधिक
गेल्या चोवीस तासांत मुंबईत २८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे २५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या २८२५ रूग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधी आता २०२३ दिवस इतका झाला आहे.

Web Title: coronavirus maharashtra 5914 corona patients discharge 4575 new patients found in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.