Coronavirus : चोवीस तासांत राज्यात ६,३८४ रुग्ण कोरोनामुक्त; ४ हजारांपेक्षा अधिक नवे कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 09:48 PM2021-08-20T21:48:49+5:302021-08-20T21:49:15+5:30
Coronavirus Update In Maharashtra : राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक.
राज्यात दररोज कोरोनाचे नवे रुग्ण अद्यापही सापडत असले तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असल्याची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत राज्यात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक रूग्णांनी कोरोनावर मात केली, तर ४ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली.
गेल्या चोवीस तासांत राज्यात ६,३८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर दुसरीकडे ४,३६५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत राज्यात १०५ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९६.९७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 20, 2021
20th August, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 322
Discharged Pts. (24 hrs) - 223
Total Recovered Pts. - 7,19,381
Overall Recovery Rate - 97%
Total Active Pts. - 2853
Doubling Rate - 2052 Days
Growth Rate (13th August - 19th August) - 0.03%#NaToCorona
मुंबईत ३२२ रूग्णांची नोंद
मुंबईतही आता कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ३२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर २२३ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत २८५३ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधी २,०५२ दिवसांवर पोहोचला आहे.