CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाचा वेग मंदावतोय, पण मृतांचा आकडा वाढताच; 24 तासांत 891 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 21:59 IST2021-05-04T21:57:43+5:302021-05-04T21:59:54+5:30
आज राज्याला कोविशिल्डचे 9 लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल.

संग्रहित छायाचित्र
मुंबई - महाराष्ट्रातील कोरनाचा कहर आता कमी होताना दिसत आहे. आज राज्यात 51 हजार 800 नवे कोरोना बाधित समोर आले. तर सोमवारी 50 हजारपेक्षाही कमी कोरोनाबाधित समोर आले होते. मात्र, असे असले, तरी गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 891 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही चिंतेची बाब आहे. (CoronaVirus Maharashtra corona new cases 51800 on tuesday and 891 new deaths reported)
आज समोर आलेल्या नव्या कोरोना बाधितांनंतर आता राज्यातील एकूण सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 6 लाख 41 हजार 910 एवढी झाली आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण 71 हजार 742 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच बरोबर गेल्या 24 तासांत 65 हजार 934 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
CoronaVirus : कसा करायचा करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना? अँथनी फाउचींनी भारताला दिला महत्वाचा सल्ला!
मुंबईत 2 हजार 500 नवे कोरोना बाधित -
मुंबईत मंगळवारी 2 हजार 554 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर गेल्या 24 तासांत 62 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 5,240 रुग्ण बरे झाले आहेत. आता कोरोनातील सक्रिय रुग्णांचा आकडा 51 हजार 380 झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6 लाख 61 हजार 420वर पोहोचला आहे.
सोमवारी 50 हजार हून कमी रुग्ण समोर आले होते -
राज्यात समोवारी 48,621 नवे कोरोना बाधीत समोर आले होते. तर याच काळात 567 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तर 59,500 रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. विशेष म्हणजे सोमवारी गेल्या तीस दिवसांनंतर नव्या कोरोना बाधितांचा आकडा 50 हजारच्या खाली आला होता.
CoronaVirus : धक्कादायक...! कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू; मुलीनं जळत्या चितेवर घेतली उडी
आज केंद्राकडून राज्याला लशीचे ९ लाख डोस मिळाले -
आज राज्याला कोविशिल्डचे 9 लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे 18 लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात 45 वर्षांवरील सुमारे 1 कोटी 65 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
टोपे म्हणाले, 1 मेपासून 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणास सुरूवात झाली. आतापर्यंत या वयोगटातील सुमारे 1 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यांच्या लसीकरणाला गती येण्यासाठी कोविशिल्ड लसीचे 13 लाख 58 हजार तर कोवॅक्सिन लसीचे 4 लाख 8९ हजार असे एकूण 18 लाखांहून अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. स्पुटनिक लस भारतात आली असून तिच्या दराबाबत चर्चा सुरू असून ते निश्चित झाल्यानंतर त्याचे डोस राज्यात मागविले जातील, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.
CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!