Coronavirus Maharashtra : राज्यात ६ ऑक्टोबरनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू, एकूण २४,९४८ नव्या रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 11:06 PM2022-01-28T23:06:56+5:302022-01-28T23:07:17+5:30
राज्यात नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक.
गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या (Coronavirus Cases) कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी राज्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली. ६ ऑक्टोंबर २०२१ नंतर २८ जानेवारी रोजी सर्वाधिक १०३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे गेल्या चोवीस तासांत राज्यात २४,९४८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यापूर्वीच्या दिवसाच्या तुलनेत ही संख्या थोडी अधिक आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात १०३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर राज्यात पॉझिटिव्हीटी रेट हा १०.३२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. गेल्य़ा चोवीस तासांमध्ये राज्यात ओमायक्रॉनच्या (Omicron Variant) ११० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यानंतर राज्यातील आतापर्यंत ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३०४० इतकी झाली आहे.
Maharashtra reports 24,948 fresh COVID cases, 45,648 recoveries, 103 deaths in the last 24 hours and 110 tested positive for Omicron
— ANI (@ANI) January 28, 2022
Total Active cases: 2,66,586 pic.twitter.com/r9rNpkxndU
एकीकडे राज्यात १०३ मृत्यूंची नोंद झाली असली तरी गेल्या चोवीस तासांमध्ये ४५,६४८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. राज्यात सध्या २ लाख ६६ हजार ५८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
#CoronavirusUpdates
२८ जानेवारी, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण- १३१२
२४ तासात बरे झालेले रुग्ण-५९९०
बरे झालेले एकूण रुग्ण-१,००९,३७४
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%
एकूण सक्रिय रुग्ण- १४३४४
दुप्पटीचा दर-२५९ दिवस
कोविड वाढीचा दर (२१जानेवारी-२७जानेवारी)-०.२७%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 28, 2022
मुंबईत दिलासादायक चित्र
मुंबईत गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली. गेल्या चोवीस तासांत मुंबईत १३१२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४९९० रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मुंबईत सध्या १४ हजार ३४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता २५९ दिवस इतका झालाय.