CoronaVirus News: राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५ लाखांच्या पुढे; काल जवळपास १३ हजार रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 06:44 IST2020-08-09T04:40:56+5:302020-08-09T06:44:10+5:30
एकूण बळी १७,३६७; दिवसभरात १२,८२२ रुग्ण, २७५ मृत्यू

CoronaVirus News: राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५ लाखांच्या पुढे; काल जवळपास १३ हजार रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यात शनिवारी १२ हजार ८२२ रुग्णांचे निदान झाले तर २७५ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांच्या संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला असून ही संख्या ५ लाख ३ हजार ८४ झाली. एकूण बळी १७,३६७ आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७.२६ टक्के असून मृत्युदर ३.४५ टक्के आहे.
दिवसभरात ११ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण कोविडमुक्त झाले. पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण राज्यात कोराना झालेले सर्वात कमी सक्रिय रुग्ण वर्धा जिल्ह्यात असून त्यांची संख्या ७२ इतकी आहे, तर पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत, ही संख्या ४१ हजार २६६ असल्याचे समोर आले आहे.
मुंबईत ९५,३५४ जण कोविडमुक्त
मुंबईत शनिवारी १३०४ कोरोनाचे रुग्ण आढळले असून ५८ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, १ लाख २२ हजार ३१६ बाधित आणि ६ हजार ७५१ बळी गेले आहेत. आतापर्यंत मुंबईत ९५,३५४ जण कोविडमुक्त झाले, तर १९,९१४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मध्यमवयीन व्यक्तींना वाढता धोका
राज्यातील एकूण संख्येत ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे ९९ हजार ७६० आहे. याखालोखाल नवजात बालक ते १० वर्षे वयोगटातील रुग्णसंख्या १९,२१३ आहे.
५१ ते ६० वयोगटात ७८,२१३, ६१ ते ७० वयोगटात ४९,२८५,७१ ते ८० वयोगटात २२,२७८, ९१ ते १०० वयोगटात ७५९ आणि १०१ ते ११० वयोगटातील एक रुग्ण आहे.