CoronaVirus News: चिंताजनक! राज्यातील कोरोना बळींची संख्या १२ हजारांच्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:12 PM2020-07-20T22:12:56+5:302020-07-20T22:15:31+5:30

CoronaVirus News: आतापर्यंत १ लाख ७५ हजार २९ रुग्ण कोविडमुक्त; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के

CoronaVirus maharashtra death toll surpasses 12000 mark 1 75 lakh patient cured | CoronaVirus News: चिंताजनक! राज्यातील कोरोना बळींची संख्या १२ हजारांच्या पुढे

CoronaVirus News: चिंताजनक! राज्यातील कोरोना बळींची संख्या १२ हजारांच्या पुढे

Next

मुंबई – तब्बल चार महिन्यांच्या कालावधीत राज्यात कोरोनाचे १२ हजारांहून अधिक बळी गेले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के असून आतापर्यंत १ लाख ७५ हजार २९ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. तर दिवसभरात ५ हजार ४६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाच्या संघर्षात देशातही आतापर्यंत सात लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त झाले, ही सकारात्मक माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात १ लाख ३१ हजार ३३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात सोमवारी ८ हजार २४० रुग्ण, तर १७६ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या ३ लाख १८ हजार ६९५ झाली असून मृतांचा आकडा १२ हजार ३० झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७७ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या १७६ मृत्यूंमध्ये मुंबई ४१, ठाणे ५, नवी मुंबई मनपा ११, कल्याण डोंबिवली मनपा ११, उल्हासनर मनपा ६, वसई विरार मनपा २, रायगड ४, पनवेल मनपा २, नाशिक मनपा २, धुळे मनपा १, जळगाव १८, जळगाव मनपा ३, पुणे ९, पुणे मनपा २२, पिंपरी चिंचवड मनपा ११, सोलापूर १, सोलापूर मनपा ४, सातारा २, कोल्हापूर ४, सांगली ४, औरंगाबाद मनपा ३, जालना १, लातूर १, नांदेड मनपा १, अमरावती १, अमरावती मनपा १, बुलढाणा २, वाशिम १, वर्धा १ आणि अन्य राज्य/ देशातील १ इ. रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत सोमवारी १०३५ रुग्णांची तर ४१ मृत्यूंची नोंद झाली आहे. शहर उपनगरात बाधितांची संख्या १ लाख २४ हजार २३ वर पोहोचली असून एकूण मृत्यू ५ हजार ७५५ झाला आहे. मुंबईत सध्या २३ हजार ७२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १६ लाख ६६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.११ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ६५ हजार ७८१ व्यक्ती घरगुती अलगीकऱणात आहेत. तर ४५ हजार ४३४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंतच्या आकेडवारीनुसार
वयोगट       बाधित रुग्ण   टक्केवारी
० ते १०        ११३७२       ३.७९
११ ते २०     २०३४४       ६.७८
२१ ते ३०     ५३०७२       १७.७०
३१ ते ४०     ६११९४       २०.४१
४१ ते ५०     ५३९४५       १७.९९
५१ ते ६०     ५०५२८       १६.८५
६१ ते ७०     ३१३९६       १०.४७
७१ ते ८०     १३७६७       ४.५९
८१ ते ९०     ३८१२          १.२७
९१ ते १००    ४५७          ०.१५
१०१ ते ११०   १               ०.००

Web Title: CoronaVirus maharashtra death toll surpasses 12000 mark 1 75 lakh patient cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.