coronavirus: जगात पाचव्या स्थानी असलेल्या ‘पेरू’पेक्षाही महाराष्ट्रात रुग्ण अधिक!, देशात सर्वाधिक संख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 03:01 AM2020-09-04T03:01:46+5:302020-09-04T03:02:31+5:30
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार पेरूमध्ये करोनाचे ६ लाख ५२ हजार ३७ रुग्ण आहेत. तर भारतात एकट्या महाराष्ट्रात ही संख्या ८ लाखावर आहे.
मुंबई - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत चालली आहे. गुरुवारी राज्यात १८ हजार १०५ नवे रुग्ण आढळले असून महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या ८ लाख ४३ हजार ८४४ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात पाचव्या स्थानी असलेल्या पेरू या देशापेक्षाही महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. महाराष्ट्र हा एक देश असता तर तो कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर राहिला असता!
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार पेरूमध्ये करोनाचे ६ लाख ५२ हजार ३७ रुग्ण आहेत. तर भारतात एकट्या महाराष्ट्रात ही संख्या ८ लाखावर आहे. कोरोनाबाधितांच्या जागतिक यादीत पहिल्या नंबरवर अमेरिका असून अमेरिकेत ६२ लाखांहून अधिक करोना रुग्ण आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोप यांच्या मते, महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या अधिक असल्याने रुग्ण संख्याही मोठी दिसत आहे. मात्र, राज्यात आत्तापर्यंत ४२ लाख ९ हजार चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्ह दर १९.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत जुलै महिन्यात २ लाख चाचण्या करण्यात आल्या, तर आॅगस्टमध्ये २ लाख ३ हजार चाचण्या झाल्या आहेत. याचाच अर्थ, गेल्या महिन्यात फक्त ३ हजार चाचण्या अधिक झाल्या आहेत.
पुण्यातील वाढती रुग्ण संख्या
लक्षात घेता तेथे लॉकडाऊन उठवण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध होता. पण त्यांच्या परस्पर तसा निर्णय घेतला गेला.
- संजय राऊत, खासदार, शिवसेना
8,43,844
महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या
महाराष्ट्र जगात ५ व्या स्थानी
अमेरिका : ६२,९१०३२ ब्राझिल : ४०,०१४२२ भारत : ३८,५३४०६
रशिया : १०,०९९९५ महाराष्ट्र : ८,४३,८४४ पेरु : ६,६३४३४
दक्षिण आफ्रिका : ६,२८२५९