Coronavirus: राष्ट्रानंतर आता महाराष्ट्रानंही रचला विक्रम; एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार लोकांचं लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 08:46 PM2021-06-22T20:46:35+5:302021-06-22T20:48:42+5:30

महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

Coronavirus: Maharashtra has set a record; Vaccination of 5 lakh 52 thousand people on today | Coronavirus: राष्ट्रानंतर आता महाराष्ट्रानंही रचला विक्रम; एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार लोकांचं लसीकरण

Coronavirus: राष्ट्रानंतर आता महाराष्ट्रानंही रचला विक्रम; एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार लोकांचं लसीकरण

Next
ठळक मुद्देरात्री ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी पाहता दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होतीसोमवारी सायंकाळपर्यंत देशभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली होती

मुंबई - राज्यात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात आज एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना  लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करतानाच त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आज दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी दि. २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.

देशाचा लसीकरणाचा विक्रम

सोमवारी सायंकाळपर्यंत देशभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. हे एका दिवसातील आजपर्यंतचे विक्रमी लसीकरण आहे. देशात १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर प्रथमच एकाच दिवशी इतक्या मोठय़ा प्रमाणावर लसीकरण करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत एकूण २८ कोटी ३३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले.

राज्यात आज ८ हजार ४०० रुग्ण आढळले

आज ९ हजार ०४३  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५७ लाख ४२ हजार २५८  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९% एवढे झाले आहे.  राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार ४७०  नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तसेच राज्यात १८८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ९८ लाख ८६ हजार ५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९ लाख ८७ हजार ५२१ (१५.०१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात ६ लाख ५८ हजार ८६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार १९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. त्याचसोबत राज्यात एकूण १ लाख २३ हजार ३४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत

Web Title: Coronavirus: Maharashtra has set a record; Vaccination of 5 lakh 52 thousand people on today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.