CoronaVirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा कहर! दिवसभरात ३५ हजार ७२६ नवे रुग्ण, १६६ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 09:29 PM2021-03-27T21:29:05+5:302021-03-27T21:31:10+5:30
CoronaVirus in Maharashtra : राज्यात आज ३५ हजार ७२६ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर १४ हजार ५२३ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज ३५ हजार ७२६ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर १४ हजार ५२३ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. (Maharashtra reports 35,726 new positive cases, 14,523 discharges and 166 deaths today)
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात ३५ हजार ७२६ नवीन नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, १६६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १४ हजार ५२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३ लाख १४ हजार ५७९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता तीन लाखांवर गेली आहे.
Maharashtra reports 35,726 new positive cases, 14,523 discharges and 166 deaths today.
— ANI (@ANI) March 27, 2021
Total cases: 26,73,461
Total recoveries: 23,14,579
Death toll: 54,073
Active cases: 3,03,475 pic.twitter.com/OVnLn5si6V
सध्या ३ लाख ०३ हजार ४७५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९१,९२,७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,७३,४६१ (१३.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,८८,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात रात्रीची जमावबंदी
राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी ( २८ मार्च ) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश शुक्रवारी मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.