Coronavirus : महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, दैनंदिन कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढते
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 12:38 PM2022-01-31T12:38:22+5:302022-01-31T12:38:54+5:30
राज्यात आता कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून, संसर्ग नियंत्रणामुळे दिलासादायक स्थिती आहे. तसेच सातत्याने रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
मुंबई : राज्यात आता कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून, संसर्ग नियंत्रणामुळे दिलासादायक स्थिती आहे. तसेच सातत्याने रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात तीन लाखांच्या टप्प्यात पोहोचलेली सक्रिय रुग्णसंख्या आता कमी होत आहे. राज्यात २९ जानेवारी रोजी उपचाराधीन रुग्णसंख्या २ लाख ४४ हजार ३४४ वर आले आहे.
मुंबई अग्रक्रमी
गेल्या आठवडाभरात पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यात संपूर्ण राज्यात मुंबईला सर्वाधिक यश आले आहे. राज्यात सर्वाधिक कमी पॉझिटिव्हिटी दर पालघर जिल्ह्यात ७.५४ टक्के, तर शहरांमध्ये मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर ८.५८ टक्के आहे.
राज्यातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर २३.८२%
राज्यात २२ जिल्ह्यांत सरासरी पॉझिटिव्हिटी दर हा राज्याच्या सरासरी पॉझिटिव्ह दरापेक्षा अधिक आहे. राज्यातील सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट हा नागपूर जिल्ह्यात ४४.५९ टक्के आहे. तर पुणे ४२.४९, नाशिक ४०.९४, गडचिरोली ३९.१८ आणि वर्धा ३८.११ या जिल्ह्यांत साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर अधिक आहे.
देशाचे चित्र
n देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे २ लाख ३४ हजार नवे रुग्ण आढळले व ८९३ जणांचा मृत्यू झाला.
n या कालावधीत ३.५१ लाख लोक बरे झाले. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ कोटी १० लाखांवर पोहोचली आहे.
सबका साथ, सबका विकास या सूत्रानेच लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणावर राबविली जात आहे. आजवर नागरिकांना कोरोना लसीचे १६५.७० कोटी डोस दिले आहेत.
- मनसुख मांडवीय,
केंद्रीय आरोग्यमंत्री.