CoronaVirus News : धक्कादायक! २४ तासांत राज्यभरात २२१ पोलिसांना कोरोनाची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:32 PM2020-05-11T12:32:34+5:302020-05-11T12:46:03+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या २४ तासांत तब्बल २२१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली. आतापर्यंतचा हा आकडा सर्वाधिक आहे.
मुंबई : राज्यभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात पोलिसांनाही कोरोनाची लागण होत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २२१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली. आतापर्यंतचा हा आकडा सर्वाधिक आहे.
राज्यभरात १ लाख २० हजार पोलीस कर्मचारी आहेत. तर १८ ते २० हजार अधिकारी वर्ग आहे. अन्य कर्मचारी पकड़ून राज्य पोलीस दलात पावणे दोन लाखाच्या जवळपास पोलीस तैनात आहे. या पोलिसांच्या खांद्यावर राज्याची जबाबदारी आहे. राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या १०६ अधिकाऱ्यांसह तब्बल ९०१ अंमलदार अशा एकूण १ हजार ७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यातील ७ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. ११३ पोलीस उपचारांअंती कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ९१ अधिकाऱ्यांसह ७९६ अंमलदार अशा एकूण ८८७ कर्मचाऱ्यांवर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सोमवारी पहाटे चारपर्यंतच्या आकडेवारीत गेल्या २४ तासांत तब्बल २२१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. आतापर्यंत दिवसाला ६० ते ७० ने वाढणारा पोलिसांचा आकडा चार पटीने वाढला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कारागृहातील २६ कर्मचाऱ्यांची भर
लॉकडाऊन असलेल्या आर्थर रोड कारागृहात कोरोनाने संक्रमण केल्याने आतापर्यंत २६ पोलीस कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे. तर १५८ कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
परप्रातीयांमुळे धोका
नाकाबंदीसह विविध बंदोबस्तामुळे पोलिसांचा नागरिकांशी थेट संपर्क येत आहे. यातच परप्रातीय मजुरांची कागदपत्र, वैद्यकीय तपासणीची जबाबदारी पोलिसांवर असल्याने त्यांना थेट हाताळताना त्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यात अनेक जण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ट्रक टेम्पोतून गावाकडे जात असल्याने पोलिसांना या ट्रकची तपासणी करणे गरजेचे बनले आहे. अशात या कामगारांना उतरवून त्यांची व्यवस्था करण्यापासून राहण्यासह जेवणाची व्यवस्था करण्याचे कामही पोलिसांवर सोपविल्याने यावर नियंत्रण आणण्याचे आव्हान पोलिसांवर आहे. तर एसटी सेवा सुरू केल्याने त्याभोवती होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणताना दमछाक होत आहे.
१२/२४ कुठे सुरू, कुठे बंद
मुंबईत पोलिसांसाठी सुरू केलेल्या १२ तास सेवा २४ तास आराम पद्धत काही ठिकाणी बंद होत आहे. तर काही ठिकाणी सुरू आहे. यात अधिकारीवर्ग नसल्याने ते कार्यरत होतेच. त्यामुळे अमलदाराबरोबर अधिकारी मोठ्या संख्येने कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. आतापर्यंत १०६ अधिकारी कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारीhttps://t.co/pjdGv5umYj#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID2019india
— Lokmat (@MiLOKMAT) May 11, 2020
क्वॉरंटाईन पोलीस कामावर
कोरोनाबाधित पोलिसांच्या संर्पकात आलेल्या पोलिसांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. सद्यस्थितीत पोलिसांना घरी थांबवणे शक्य नाही. त्यामुळे जोपर्यंत पूर्ण लक्षणे दिसत नाही तोपर्यंत या पोलिसांना कामावर बोलवले जात आहे. त्यामुळे क्वॉरंटाईन केलेले पोलीस बंदोबस्त, तसेच सगळीकडे फिरतात. त्यामुळे त्यांच्यातला पॉझिटीव्ह येईपर्यन्त अन्य पोलिसांना याची बाधा होत असल्याचेही चित्र आहे. तर काही ठिकाणी क्वॉरंटाईन करणेही बंद केले आहे.
जे जे मार्ग पोलीस ठाण्यात ३३ कर्मचारी
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईत आतापर्यंत २०० हून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा आहे. यात एक आयपीएस अधिकारीही अडकले. त्यात राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित पोलीस असलेल्या जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील आकडा ३३ वर आहे. तर मुंबईतल्या विविध पोलीस ठाण्यासह प्रादेशिक विभागातही कोरोनाचा संसर्ग संक्रमण करत असल्याने पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अन्य यंत्रणावर जबाबदारी देणे गरजेचे
पोलिसांवरचा वाढता ताण कमी होणे गरजेचे आहे. त्यामुळे अन्य यंत्रणावरही जबाबदारी सोपविणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हल्लेही सुरुच
राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा चिंता वढ़विणारा असताना पोलिसांवर हल्लेही सुरू आहे. आतापर्यन्त पोलिसांवर हल्ल्यांप्रकरणी २०७ गुन्हे नोंद आहे. तर ७४७ जणांना अटक करण्यात आली आहे. यात ८२ पोलीस जखमी झाले आहेत. यात एक होमगार्डचा समावेश आहे.
CoronaVirus News : लय भारी! 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने फोन, नोटा करा सॅनिटाईजhttps://t.co/COdJ4Um5cI#coronavirus#technology
— Lokmat (@MiLOKMAT) May 11, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लय भारी! 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने फोन, नोटा करा सॅनिटाईज