CoronaVirus चिंताजनक! राज्यात मृतांचा आकडा पुन्हा पन्नाशी पार; रुग्णांमध्ये घट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 10:02 PM2020-05-12T22:02:12+5:302020-05-12T22:13:37+5:30
मुंबईची आजची आकडेवारी काहीशी दिलासा देणारी आहे. आज मुंबईत ४२६ नवे रुग्ण सापडले आहेत.
मुंबई : मुंबईमध्ये आज नव्या रुग्णांची संख्या घटलेली असताना राज्यातील आकडेवारी चिंतेत टाकणारी आहे. राज्यात आज ५३ जणांचा मृत्यू झाला असून दोन दिवसांपूर्वीही हाच आकडा होता.
मुंबईची आजची आकडेवारी काहीशी दिलासा देणारी आहे. आज मुंबईत ४२६ नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून हा आकडा ७०० ते ९०० च्या आसपास जात होता. तर आज यात निम्म्याने घट झाली आहे. दिवसभरात २०३ रुग्ण बरे झाले आहेत. तर आज ६१३ संभाव्य कोरोनाबाधितांना भरती करण्यात आले आहे.
तर राज्यात आज दिवसभरात १०२६ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. म्हणजेच मुंबई वगळता उर्वरित राज्यात ६०० नवे रुग्ण सापडले आहेत. तर एकूण रुग्णांची संख्या २४४२७ वर गेली असून आज ५३ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ९२१ वर गेला आहे.
1026 more #COVID19 cases & 53 deaths reported in Maharashtra today. Total number of cases in the state is now at 24427, including 921 deaths: State Health Department pic.twitter.com/KoaYJZMgRo
— ANI (@ANI) May 12, 2020
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus मुंबईला मोठा दिलासा! नव्या रुग्णांची संख्या निम्म्याने घटली
Breaking स्वावलंबी भारतासाठी एकूण २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदार पुत्राची महामार्गावर घोडेस्वारी
CoronaVirus तळीरामांचे फावले! ऑर्डर दिल्यावर राज्यात दारु घरपोच मिळणार
चीनने युआनचे अवमुल्यन केले तर? अभिजीत बॅनर्जींनी सांगितले अर्थकारण
CoronaVirus अमेरिकेतील भारतीय मोठ्या संकटात; नोकरी गेली, एअर इंडियानेही नाकारले