CoronaVirus राज्यात नव्या रुग्णांची संख्या वाढतीच; मृतांचा आकडा १०६८ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 08:49 PM2020-05-15T20:49:23+5:302020-05-15T20:50:04+5:30

सध्याची वाढती संख्या पाहता राज्यात मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. मुंबईला तत्काळ बेड मिळायला हवेत. जूनपर्यंतचा डबलिंग रेट पाहता मुंबईमध्ये लाखभर पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यासाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

CoronaVirus Marathi news 1576 new patient & 49 deaths reported in Maharashtra today hrb | CoronaVirus राज्यात नव्या रुग्णांची संख्या वाढतीच; मृतांचा आकडा १०६८ वर

CoronaVirus राज्यात नव्या रुग्णांची संख्या वाढतीच; मृतांचा आकडा १०६८ वर

Next

मुंबई : महाराष्ट्रामध्ये गुरुवारी नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा १६०० पार गेलेला होता. आजही या आकड्यामध्ये किंचितसाच फरक पडलेला असून दिवसभरात ४९ मृत झाले आहेत. 


सध्याची वाढती संख्या पाहता राज्यात मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. मुंबईला तत्काळ बेड मिळायला हवेत. जूनपर्यंतचा डबलिंग रेट पाहता मुंबईमध्ये लाखभर पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यासाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १५००० मध्यम बाधित रुग्ण आणि १००० आयसीयु बेडची व्यवस्था करण्य़ात येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच तीस हजार जागांवर येत्या दीड महिन्यात भरती करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. 


आज राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आला असून आज दिवसभरात १५७६ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर ४९ मृत्यू झाले आहेत. राज्यात एकूण २१४६७ रुग्ण उपचार घेत असून १०६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ६५६४ रुग्ण बरे झाले आहेत. 



 

महत्वाच्या बातम्या...

EPFO चा मोठा दिलासा; लॉकडाऊनमध्ये पीएफ भरण्यास उशिर झाला तर दंड माफ

सज्ज व्हा! राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा

मजुरांना पायी जाण्यापासून रोखू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार

शेतमालाच्या किंमतीला मिळणार कायद्याचे संरक्षण; अर्थमंत्र्यांचे मोठे आश्वासन

Atmanirbhar Bharat Abhiyan कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Corona Lockdown कोरोनाचे वेगळेच, लॉकडाऊनने घेतले शेकडो बळी; 91 जणांनी तर आत्महत्याच केली

Web Title: CoronaVirus Marathi news 1576 new patient & 49 deaths reported in Maharashtra today hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.