CoronaVirus News: राज्यात कोरोनाचे २३ लाख ९५ हजार रुग्ण घरगुती अलगीकरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:14 AM2020-10-18T10:14:13+5:302020-10-18T10:15:59+5:30
राज्यात शनिवारी १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १३ लाख ५८ हजार ६०६ रुग्ण कोविडमुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ८५.६५ टक्क्यांवर पोहोचला. राज्यात दिवसभरात १० हजार २५९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून २५० मृत्यूंची नोंद झाली. (CoronaVirus)
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने घट होते आहे. तर दुसरीकडे अजूनही राज्यात २३ लाख ९५ हजार ५५२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २३ हजार ७४९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. राज्यात सध्या १ लाख ८५ हजार २७० सक्रिय रुग्णांवर उपचार
सुरू आहेत.
राज्यात शनिवारी १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १३ लाख ५८ हजार ६०६ रुग्ण कोविडमुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ८५.६५ टक्क्यांवर पोहोचला. राज्यात दिवसभरात १० हजार २५९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून २५० मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५ लाख ८६ हजार ३२१ झाली असून बळींचा आकडा ४१ हजार ९६५ झाला आहे. राज्याचा मृत्युदर २.६५ टक्के आहे.
मुंबईत कोरोनाचे २२,६६४ सक्रिय रुग्ण -
च्मुंबईत दिवसभरात कोरोनाचे २ हजार ९८८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ७ हजार ४७४ रुग्ण कोविडमुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर राज्याच्या बरोबरीने म्हणजेच ८६ टक्क्यंवर गेला आहे. मुंबईत कोरोनाचे २२,६६४ सक्रिय रुग्ण आहेत.
च्मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ८६ दिवसांवर गेला आहे. शनिवारी १,७९१ कोरोना रुग्ण आढळले असून ४७ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ४० हजार ३३५ पोहोचली असून मृतांची संख्या ९,७३९ झाली.