CoronaVirus in Ratnagiri रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ५ कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 10:40 PM2020-05-15T22:40:17+5:302020-05-15T22:41:14+5:30

कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८२

CoronaVirus Marathi news 5 more corona patients in Ratnagiri district hrb | CoronaVirus in Ratnagiri रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ५ कोरोना रुग्ण

CoronaVirus in Ratnagiri रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ५ कोरोना रुग्ण

Next

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, गुरुवारी रात्री उशिराने मिरज येथून आलेल्या ७४ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर शुक्रवारी रात्री आणखी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एक अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८२ झाली आहे. शुक्रवारी नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील एक तर चार अहवाल खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील आहेत.

जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण वाढत असतानाच कोरोनाबाधितांची संख्यादेखील वाढत आहे. मुंबई, ठाणे व पुणे येथून आलेले नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येत असून, हे अहवाल येईपर्यंत त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. रेडझोन किंवा कन्टेनमेंट झोनमधून येणाऱ्या नागरिकांना तत्काळ विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. मिरज येथे पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी ७४ अहवाल गुरुवारी रात्री उशिराने प्राप्त झाले. त्यातील तीन अहवाल पॉझिटिव्ह आले असून, उर्वरीत ७१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

जिल्हा रुग्णालयातील दोन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते़  त्यातील नर्सिंग कॉलेजच्या एका विद्यार्थिनीचा अहवाल पॉझिटिव्ह, तर दुसरा अहवाल निगेटिव्ह आला़ नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थिनींपैकी पाचजणांना कोरोनाची लागण झाली असून, उर्वरीत विद्यार्थिनींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा पेठेतील कनावजेवाडी आणि देवळे येथील दोन महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़  त्यानंतर शुक्रवारी रात्री आणखीन ६ अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील पाच अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यात चार कळंबणी रुग्णालयातील अहवालांचा समावेश आहे. एक अहवाल रत्नागिरीतील असून, एक अहवाल निगेटिव्ह आला आहे.

महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus कोरोनाशी लढण्यासाठी 'वानखेडे' तत्काळ ताब्यात द्या; मुंबई महापालिकेचे एमसीएला पत्र

CoronaVirus बापरे! देश हादरला; कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने चीनलाही टाकले मागे

CoronaVirus राज्यात नव्या रुग्णांची संख्या वाढतीच; मृतांचा आकडा १०६८ वर

EPFO चा मोठा दिलासा; लॉकडाऊनमध्ये पीएफ भरण्यास उशिर झाला तर दंड माफ

सज्ज व्हा! राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा

मजुरांना पायी जाण्यापासून रोखू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार

शेतमालाच्या किंमतीला मिळणार कायद्याचे संरक्षण; अर्थमंत्र्यांचे मोठे आश्वासन

Atmanirbhar Bharat Abhiyan कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Corona Lockdown कोरोनाचे वेगळेच, लॉकडाऊनने घेतले शेकडो बळी; 91 जणांनी तर आत्महत्याच केली

Web Title: CoronaVirus Marathi news 5 more corona patients in Ratnagiri district hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.