CoronaVirus दिलासादायक! राज्यात आज विक्रमी संख्येने रुग्णांना डिस्चार्ज; मृत्यूचा आकडाही घटला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 09:14 PM2020-05-11T21:14:31+5:302020-05-11T21:15:43+5:30
मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये आज ५७ नवे कोरोनाग्रस्त सापडले; एकूण आकडा ९१६ वर गेला आहे. तर मुंबईमध्ये आज दिवसभरात ७९१ रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात ५६७ रुग्णांना भरती करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबईत आज कोरोना ग्रस्त रुग्णांचा आकडा घटलेला असताना राज्यभरातूनही मोठा दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. राज्यात आज १२३० नवे रुग्ण सापडले असून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यभरात रविवारी १२७८ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. तर ३९९ रुग्ण बरे झाले होते. मात्र, आज नव्या रुग्णांचा आकडा काहीसा घटलेला असला तरीही आजची बरे होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी मोठी आहे. आज राज्यात ५८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४७८६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
दरम्यान, राज्यात एकूण २३,४०१ रुग्ण सापडले असून बळींचा आकडा ८६८ वर गेला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २०, सोलापूर शहरात ५, पुण्यात ३ , ठाणे शहरात २, अमरावती जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, नांदेड शहरात १, रत्नागिरी मध्ये १ तर वर्धा जिल्ह्यात १ मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील एक मृत्यू मुंबई येथे झाला आहे. सध्या राज्यात २,४८,३०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५,१९२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये आज ५७ नवे कोरोनाग्रस्त सापडले; एकूण आकडा ९१६ वर गेला आहे. तर मुंबईमध्ये आज दिवसभरात ७९१ रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात ५६७ रुग्णांना भरती करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus मुंबईत नव्या रुग्णांचे प्रमाण घटले निदान; आज २० मृत्यूंची नोंद
CoronaVirus कोरोनापासून गावांना लांब ठेवा; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती
पाकिस्तानची जिरली! भारतातून औषधांआडून 'या' वस्तूची तस्करी
Vidhan Parishad Election उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? आज पहिल्यांदाच झाला खुलासा
धक्कादायक! इराणने स्वत:च्याच युद्धनौकेवर मिसाईल डागले; 19 नौसैनिकांचा मृत्यू
CoronaVirus नियम बदलले, १५५९ रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय