CoronaVirus News : धक्कादायक! राज्यातील 786 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सात जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 11:28 AM2020-05-10T11:28:22+5:302020-05-10T11:37:49+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. वेळप्रसंगी ते स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत.

CoronaVirus Marathi News 786 police tested positive COVID19 in Maharashtra SSS | CoronaVirus News : धक्कादायक! राज्यातील 786 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सात जणांचा मृत्यू

CoronaVirus News : धक्कादायक! राज्यातील 786 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सात जणांचा मृत्यू

Next

मुंबई - कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 62000 हून अधिक  झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. वेळप्रसंगी ते स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत. याच दरम्यान राज्यातील अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. 

महाराष्ट्रातील तब्बल 786 पोलिसांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांपैकी 703 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 76  पोलीस कर्मचारी बरे झाले आहेत. कोरोना संकटाच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना वाढतच आहेत. लॉकडाऊन दरम्यान अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले करण्यात आले. लॉकडाऊन कालावधीत पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या 200 घटना घडल्या आहेत आणि त्यासाठी 732 आरोपींना अटक करण्यात आली आहे

मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात दोन पोलिसांवर एका तरुणाने हल्ला केल्याची घटना घडली. हल्लखोर तरुणाला अटक करण्यात आली असून जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत. मरिन ड्राईव्ह परिसरात प्रदीप नायर नावाच्या तरुणानं पोलिसांवर हल्ला केला. रात्री दीड वाजता ही घटना घडली. हा तरुण ब्रीच कँडी जवळील सिल्व्हर ओक इस्टेट परिसरात राहत असल्याची माहिती मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्यूंजय हिरेमठ यांनी दिली. प्रदीप नायरनं नाकाबंदीवर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कोयत्यानं हल्ला केला. या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला आणि हाताला दुखापत झाली. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे एकूण 3277 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 127 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 62939 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2109 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रविवारी (10 मे) आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 62,939 वर

CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्राने वाढवली सरकारची चिंता

CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी

CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका

 

Web Title: CoronaVirus Marathi News 786 police tested positive COVID19 in Maharashtra SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.