CoronaVirus News : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 09:53 AM2020-08-15T09:53:15+5:302020-08-15T10:06:55+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.

CoronaVirus Marathi News Cooperation minister Balasaheb Patil corona positive | CoronaVirus News : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण 

CoronaVirus News : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण 

Next

कराड - राज्याचे सहकार मंत्री, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी रात्री त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रात्री उशिरा त्यांना कराडच्या कृष्णा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान बाळासाहेब पाटील याची तब्येत ठीक आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. काळजी करण्याची गरज नाही अशी माहिती कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा पाच लाखांच्या वर गेला आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 

अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने चार लाखांचा टप्पा पार केला आहे. शुक्रवारी दिवसभरात १०,४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४ लाख १ हजार ४४२ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के इतके आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात १२,६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३६४ मृत्यू झाले. सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मृत्युदर ३.३९% एवढा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2020 : "देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार"

Independence Day 2020 : "आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र"

सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी रिया 'या' व्यक्तीशी बोलली 1 तास, जाणून घ्या कोणाला केले शेवटचे 5 कॉल

"कोरोनाची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारने रणनीती आखण्याची गरज"

भयंकर! एकटं राहण्यासाठी 'तो' कुटुंबाच्या जीवावर उठला, आईस्क्रिममध्ये विष टाकून बहिणीची हत्या

'दारूची दुकाने उघडली आणि जिम बंद, हे अतिशय दुर्दैवी', फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, म्हणाले...

Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; 2 पोलीस कर्मचारी शहीद, एक जखमी


 

Web Title: CoronaVirus Marathi News Cooperation minister Balasaheb Patil corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.