CoronaVirus News : गुड न्यूज! राज्यातील तब्बल 15 लाख जणांनी जिंकली कोरोनाची लढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 08:55 PM2020-11-01T20:55:41+5:302020-11-01T21:04:27+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्या 16 लाखांवर पोहोचली आहे. आज कोरोनाचे 5,369 रुग्ण आढळले असून 113 जणांचा मृत्यू झाला आहे
मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले आहे, रुग्णांच्या संख्येने 81 लाखांचा टप्पा पार केला असून रुग्णांचा आकडा 81,84,083 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत देशभरात तब्बल 1,22,111 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्या 16 लाखांवर पोहोचली आहे. आज कोरोनाचे 5,369 रुग्ण आढळले असून 113 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
राज्यात आतापर्यंत तब्बल 15 लाख लोकांनी कोरोनावर मात केली असून 15,14,079 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. तसेच 3,726 रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण कोरोनाचे 1,25,109 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.92% झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी (1 नोव्हेंबर) कोरोनाचे 5,369 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 113 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 16,83,775 वर पोहोचली आहे.
Maharashtra reports 5,369 new #COVID19 cases, 3,726 discharges and 113 deaths, as per State Public Health Department.
— ANI (@ANI) November 1, 2020
COVID-19 tally of the State rises to 16,83,775 including 15,14,079 recoveries and 44,024 deaths. Active cases is at 1,25,109. pic.twitter.com/7dp1x71Js7
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 44 हजारांवर पोहोचला असून आतापर्यंत 44,024 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल 15 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 15,14,079 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना चाचणीचे प्रमाण देखील वाढवण्यात आले आहे.
CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाचा वेग मंदावतोय, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१५ टक्क्यांवरhttps://t.co/XsddNNgVvo#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) October 31, 2020
मोठा दिलासा! कोरोना हरणार, देश जिंकणार; ५० टक्क्यांनी कमी होतेय रुग्णवाढ, सुखावणारा ग्राफ
देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.15 टक्क्यांवर पोहोचले आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 6 लाखांहून कमी झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भीतीचे वातावरण निर्माण केलेल्या कोरोनाबाबत आता महत्त्वाची महिती समोर आली आहे. सप्टेंबरच्या मध्यावर शिखर गाठल्यानंतर कोरोनाचा ग्राफ आता 50 टक्क्यांनी खाली घसरला आहे. रुग्ण आणि मृत्यूच्या वाढीच्या तुलनेत घट झाल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या सात दिवसांची सरासरी पाहिली असता गुरुवारपर्यंत देशात 47 हजार रुग्ण दररोज आढळत होते. ही संख्या 17 सप्टेंबरच्या कोरोनाने रुग्ण संख्येच्या अर्धीच आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग तीव्र गतीने होत असताना गेल्या एका आठवड्यापासून 50 टक्के कमी रुग्णवाढ होत आहे.
CoronaVirus News : घरबसल्या 100 रुग्ण झाले ठणठणीत, कोरोनावर केली मात; आरोग्य विभागाने दिली महत्त्वाची माहितीhttps://t.co/guzmFWBizl#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) October 31, 2020
CoronaVirus News : लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना ओळखणं सोपं होणार, जाणून घ्या कसं?https://t.co/wlrt7xjKEL#coronavirus#Corona#Mobile#technology
— Lokmat (@MiLOKMAT) October 31, 2020