CoronaVirus News : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 01:07 PM2020-06-12T13:07:07+5:302020-06-12T13:25:09+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हळूहळू उठवण्यास सुरुवात केली. मात्र पुन्हा लॉकडाऊन होणार अशा अफवा पसरल्या
मुंबई - महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हळूहळू उठवण्यास सुरुवात केली. मात्र पुन्हा लॉकडाऊन होणार अशा अफवा पसरल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आता मोठा खुलासा केला आहे. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत असं म्हटलं आहे. गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे.
उद्धव ठाकरे यांनी 'आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरू करत आहोत. पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही' असं म्हटलं आहे. तसेच बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगिकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
Lockdown will not be re-announced. Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray has requested and appealed to the people not to crowd anywhere and follow the instructions given by the government: CMO Maharashtra pic.twitter.com/LEsMCdV44N
— ANI (@ANI) June 12, 2020
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्क्यांवर (४७.२ टक्के) आला असून, मुंबईतील धारावीतून गेल्या काही दिवसांपासून रुग्ण येण्याची संख्या मंदावली आहे, तसेच राज्याचा मृत्यूदर ३.७ टक्क्यांवर आला आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात ३ हजार ६०७ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, दिवसभरात १५२ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या ९७ हजार ६४८ झाली असून, बळींचा आकडा ३ हजार ५९० वर गेला आहे. सध्या राज्यात ४७ हजार ९६७ सक्रिय रुग्ण आहेत.
CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने मोडला रेकॉर्ड, गाठला नवा उच्चांकhttps://t.co/mn4PePX0LY#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 12, 2020
राज्यात दिवसभरात १ हजार ५६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर राज्यात आतापर्यंत एकूण ४६ हजार ७८ जण कोविडमुक्त झाले आहेत. मुंबईत गुरुवारी १,५४० रुग्णांची नोंद झाली. शहरातील वरळी, धारावी, वडाळा, भायखळा या विभागांत आता चित्र बदलले आहे. महापालिकेच्या ‘चेसिंग द व्हायरस’ या उपक्रमामुळे या विभागांमध्ये दररोज रुग्ण वाढण्याचा दर आता दोन टक्क्यांहून कमी आहे.
केंद्र शासनाने कंटेन्मेंट झोनसाठी लागू केलेले निकष बदलावेत, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे.
CoronaVirus News : कौतुकास्पद! फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करण्यात बजावली महत्त्वाची भूमिकाhttps://t.co/J259vEWSz7#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 12, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्टरची कमाल; कोरोना रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया
CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! 14 मृतदेहांचा 'तो' धक्कादायक Video व्हायरल
"आता आपल्याकडे मौनेंद्र मोदी आहेत ते..."; भारत-चीन सीमावादावरून पंतप्रधानांवर निशाणा
CoronaVirus News : बापरे! तब्बल 35 निगेटिव्ह लोकांना दिला कोरोनाचा 'पॉझिटिव्ह' रिपोर्ट अन्...
CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्याला यश येणार, मांजरींवरील 'हे' औषध प्रभावी ठरणार?