CoronaVirus News: राज्यात एकाच दिवसात वाढले 11514 कोरोनाबाधित, 10854 रुग्ण बरे होऊन घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 09:54 PM2020-08-06T21:54:59+5:302020-08-06T21:59:40+5:30
राज्यात ९ लाख ७६ हजार ३३२ लोक होम क्वारंटाइन आहेत. सध्या ३७ हजार ७६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबई - राज्यासह संपूर्ण देशातच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, आज महाराष्ट्रात एक चिंतेची तर दुसरी दिलासादायक बातमी आहे. दिलासादायक बातमी ही, की आज तब्बल 10 हजार 854 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर चिंताजनक बातमी ही, की राज्यात आज तब्बल 11 हजार 514 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. रुग्ण संख्येत सातत्याने होणारी वाढ ही चिंतेचा विषय आहे.
राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 4 लाख 79 हजार 779 एवढी झाली आहे. तर एकूण 3 लाख 16 हजार 375 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. सध्या राज्यात एकूण 1 लाख 46 हजार 305 सक्रिय रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज 11514 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 479779 अशी झाली आहे. आज नवीन 10854 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 316375 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 146305 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates#MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) August 6, 2020
राज्यात आज नोंद झालेल्या एकूण ३१६ मृत्यूंपैकी २४६ मृत्यू हे गेल्या ४८ तासांतील आहेत, ४४ मृत्यू हे मागच्या आठवड्यातील आहेत. तर उरलेले २६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षाही अधिक कालावधीचे आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २४ लाख ८७ हजार ९९० नमुन्यांपैकी ४ लाख ७९ हजार ७७९ नमुने पॉझिटिव्ह (१९.२८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ७६ हजार ३३२ लोक होम क्वारंटाइन आहेत. सध्या ३७ हजार ७६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३१६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५० टक्के एवढा आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
झटक्यात चमकलं मजुराचं नशीब; पाण्याने धुतली माती, मिळाले लाखोंचे हिरे
"मंदिर तोडणारे तुमचेच पूर्वज होते"; एमआयएम नेते ओवेसींना रिझवींनी फटकारलं
Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!
मशिदीच्या पायाभरणीवर योगींचं वक्तव्य; म्हणाले - "मला कुणी बोलावणार नाही अन् मी जाणारही नाही"
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...