CoronaVirus News: विमान प्रवाशांसाठी 'अशा' आहेत महाराष्ट्र सरकारच्या गाइडलाइन्स, 14 दिवस रहावे लागणार होम क्वारंटाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 09:32 PM2020-05-25T21:32:39+5:302020-05-25T21:38:11+5:30

कोरोना संकट निश्चितपणे लवकर जाणार नाही. मात्र, आहे ती परिस्थितीच सामान्य असल्याचे मानत नवी सुरूवात केली जात आहे.

CoronaVirus Marathi News maharashtra govts new sop for air travellers sna | CoronaVirus News: विमान प्रवाशांसाठी 'अशा' आहेत महाराष्ट्र सरकारच्या गाइडलाइन्स, 14 दिवस रहावे लागणार होम क्वारंटाइन

CoronaVirus News: विमान प्रवाशांसाठी 'अशा' आहेत महाराष्ट्र सरकारच्या गाइडलाइन्स, 14 दिवस रहावे लागणार होम क्वारंटाइन

Next
ठळक मुद्देदुसऱ्या राज्यांतून विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने काही नियम निर्धारित केले आहेत.प्रवासी जर एखाद्या कार्यालयात काम करत असेल, तर स्थानिक प्रशासन होम आयसोलेशनमध्ये काही सूट देऊ शकते. SOP कोरोना लक्षण असलेल्या रुग्णांसाठी लागू असेल.

मुंबई : देशातील सर्वच विमानतळांवर आज विमाने सुरू करण्यात आली. सर्वच विमानतळांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. कोरोना संकट निश्चितपणे लवकर जाणार नाही. मात्र, आहे ती परिस्थितीच सामान्य असल्याचे मानत नवी सुरूवात केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर, दुसऱ्या राज्यांतून विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने काही नियम निर्धारित केले आहेत. येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग होईल आणि डाव्या हातावर शिक्का मारला जाईल. तसेच त्यांच्यासाठी 14 दिनसांचे होम आयसोलेशन अनिवार्य असेल.

जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा

प्रवासी जर एखाद्या कार्यालयात काम करत असेल, तर स्थानिक प्रशासन होम आयसोलेशनमध्ये काही सूट देऊ शकते. तसेच आवश्यकतांचा विचार करूनही प्रशासन सूट देण्यावर विचार करू शकते.

जर एखादा प्रवासी महाराष्ट्रात आला आणि तो एक आठवड्यातच परत जाणार असेल तर, त्याला होम आयसोलेशनमध्ये राहणे अनिवार्य नाही. मात्र, त्यांना यासंदर्भात राज्य सरकारला माहिती द्यावी लागेल. तसेच, अशा व्यक्तीला कंटेन्मेंट झोनमध्ये जाण्याची परवानगी नसेल.

 CoronaVirus News : चिंताजनक! सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जगातील टॉप 10 देशांमध्ये पोहोचला भारत, इराणला टाकले मागे

महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या गाइडलाइन्समध्ये म्हणण्यात आले आहे, की एखादा प्रवासी रेसिडेंशल भागात राहण्यासाठी जात नसेल, तर त्याला आपल्या राहण्याच्या ठिकाणासंदर्भात माहिती द्यावी लागेल. जेनेकरून संबंधित ठिकाणाचे सॅनिटायझेशन करता येईल. 

मोदी सरकारचे शक्तीशाली चीनला 30 दिवसांत 3 मोठे धक्के, संपूर्ण जगच गेलंय 'ड्रॅगन'च्या विरोधात

SOP कोरोना लक्षण असलेल्या रुग्णांसाठी लागू असेल. एअरपोर्टपर्यंत रस्त्याने जाण्याची परवानगी असेल. मात्र, प्रवाशांना कंटेन्मेंट झोनमध्ये जाण्याची अथवा तेथून बाहेर जाण्याची परवानगी नसेल. प्रवाशाला रेडझोनमधून बाहेर जाण्यासाठी आधीच परवानगी घ्यावी लागेल.

CoronaVirus News : चिंताजनक! सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जगातील टॉप 10 देशांमध्ये पोहोचला भारत, इराणला टाकले मागे

Web Title: CoronaVirus Marathi News maharashtra govts new sop for air travellers sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.