CoronaVirus News: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 42 हजारांच्या पुढे, दिवसभरात 4 हजार 161 जण बरे होऊन घरी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 10:22 PM2020-06-24T22:22:31+5:302020-06-24T22:30:43+5:30
राज्यात एकूण 73,792 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 62,354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत”.
मुंबई : राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. चिंतेची बाब म्हणजे, राज्यातील नव्या रुग्णांची संख्या रोज नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 3 हजार 890 नवे रुग्ण समोर आले आहेत. यातच दिलासादायक गोष्ट म्हणजे, आज तब्बल 4 हजार 161 करोनाबाधित ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “राज्यात आज 3,890 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 1,42,900वर पोहोचली आहे. आज नवीन 4,161 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 73,792 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 62,354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत”.
राज्यात आज 3890 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 142900 अशी झाली आहे. आज नवीन 4161 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 73792 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 62354 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates#MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 24, 2020
देशात पुन्हा लॉकडाउनची शक्यता -
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरू आहे. चेन्नई, नंतर गुवाहाटी आणि आता पश्चिम बंगालने लॉकडाउन लागूदेखील केला आहे. बेंगळुरूसह इतरही काही शहरे पुन्हा लॉकडाउनचा विचार करत आहेत. महानगरांमध्ये कोरोनाचा वेग वाढल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 लाख 50 हजारचा टप्पाही ओलांडला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना तामिळनाडू सरकारने चेन्नै आणि जवळपासच्या तीन जिल्ह्यांत 30 जूनपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने गुवाहाटीच्या 11 नगर पालिका भागांत मंगलवारपासून 14 दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाउन -
महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही कोरोनाने वेगाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगाल सरकारने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाउन लागू राहील. मात्र, लॉकडाउनमध्ये पूर्वीपेक्षा अधिक सूट देण्यात येईल, असेही ममता बॅनर्जी सरकारने म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार
मोदी सरकारनं पतंजलीच्या कोरोना औषधाची जाहिरात थांबवली, बाबा रामदेव म्हणाले...