OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 08:19 PM2020-05-06T20:19:36+5:302020-05-06T20:27:01+5:30
CoronaVirus मुंबईत एकट्या धारावीमध्ये रोज ३०-४० च्या आसपास कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असताना आज हा आकडा जवळपास दुपटीने वाढला आहे.
मुंबई : मुंबईतील रुग्णांचा आकडा कमालीचा वाढत असल्याने राज्याच्या आकडेवारीवर मोठा परिणाम दिसून येत आहे. आज राज्यातील नव्या कोरोना ग्रस्तांमध्ये मोठी वाढ झाली असून राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मुंबईत एकट्या धारावीमध्ये रोज ३०-४० च्या आसपास कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असताना आज हा आकडा जवळपास दुपटीने वाढला आहे. तर मुंबईतील आकडेवारी अद्याप आलेली नसून राज्याचा आजचा एकूण आकडा चिंता वाढवणार आहे.
राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक १२३३ रूग्णांचे निदान झाले https://t.co/CbvSFUB0GJ
— Lokmat (@MiLOKMAT) May 6, 2020
राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक १२३३ रूग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या १६, ७५८ वर पोहोचली आहे. तर ३४ मृत्यूंची नोंद झाली असून एकूण ६५१ बळी गेले आहेत. आज २७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३०९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
34 deaths and 1233 new #COVID19 positive cases reported in Maharashtra today, taking the total number of cases in the state to 16,758; death toll stands at 651: State Health Department pic.twitter.com/SP93IDsu3A
— ANI (@ANI) May 6, 2020
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ
CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले
धक्कादायक! योगी आदित्यनाथांना क्वारंटाईन तरुण भेटला; उत्तर प्रदेशात उडाली खळबळ
CoronaVirus महिला कोरोनाबाधित सापडली; खासगी हॉस्पिटलने गुपचूप सरकारी रुग्णालयात सोडले