CoronaVirus in Thane ठाणे जिल्हा @ 3139; आज नव्या रुग्णांची विक्रमी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 08:26 PM2020-05-15T20:26:55+5:302020-05-15T20:27:55+5:30
कल्याण डोंबिवली येथे 33 नवीन मिळून आलेल्या रुग्णांमुळे एकूण संख्या 424 झाली आहे. तेथेही एकाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 9 झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक 234 रुग्ण एकाच दिवशी सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांनी 3 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात शुक्रवारी सर्वात जास्त 13 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा शंभर झाला आहे.शुक्रवारी जिल्ह्यातील ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक 83 नवे रुग्ण नोंदवले गेले असून सर्वात जास्त 6 जणांच्या मृत्यूची ही नोंद ठामपामध्ये झाली आहे. त्यापाठोपाठ नव्या रुग्णांसह मृत्यूमुखी पडण्याची संख्या नवीमुंबईत आहे. तसेच नवीमुंबईने एक हजारांचा तर केडीएमसीने चारशेचा आकडा पार केला आहे.एकूण तीन हजार 139 रुग्णांपैकी एक हजार 48 रुग्ण हे एकट्या नवीमुंबईतील असल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात गुरुवारी 195 सर्वात जास्त रुग्ण एकाच दिवशी सापडले होते. तो विक्रम चोवीस तासांमध्ये मोडीत निघाला असून शुक्रवारी तब्बल 234 नवीन रुग्णांची नोंदणी झाली आहे. त्याचबरोबर 13 जणांच्या मृत्यूची एकाच दिवशी होण्याची पहिलीच जिल्ह्यातील वेळ आहे. त्यातच ठामपामध्ये 83 नव्या रुग्णांमुळे तेथील रुग्ण संख्या 996 झाली आहे. तर दुसरीकडे ठामपामध्ये 6 जण दगवल्याने मृतांचा आकडा ही 48 वर पोहोचला आहे. त्या खालोखाल नवीमुंबई 74 रुग्णांची नोंदणी झाल्याने येथील रुग्ण संख्या एक हजार 48 वर पोहोचली आहे.येथेच चार जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 23 इतका झाला आहे.
कल्याण डोंबिवली येथे 33 नवीन मिळून आलेल्या रुग्णांमुळे एकूण संख्या 424 झाली आहे. तेथेही एकाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 9 झाली आहे. 13 नवीन रुग्ण उल्हासनगर येथे आढळून आल्याने रुग्ण 94 वर पोहोचली आहे. तेथे एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 5 वर गेली आहे. तर अंबरनाथ येथील नव्या 9 रुग्णांमुळे रुग्ण संख्या 32 झाली आहे. ठाणे ग्रामीण मध्येही 8 रुग्ण सापडल्याने रुग्ण संख्या 137 वर गेली आहे. मिराभाईंदर आणि भिवंडीत प्रत्येकी 5 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने तेथील अनुक्रमे रुग्ण संख्या 291 आणि 38 इतकी आहे. मात्र मिराभाईंदरमध्ये एक जण दगावल्याने मृतांची संख्या 8 झाली आहे. त्याचबरोबर सर्वात कमी 4 नवे रुग्ण बदलापूरात सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 79 इतकी असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
महत्वाच्या बातम्या...
EPFO चा मोठा दिलासा; लॉकडाऊनमध्ये पीएफ भरण्यास उशिर झाला तर दंड माफ
राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार; राजेश टोपेंची घोषणा
मजुरांना पायी जाण्यापासून रोखू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार
शेतमालाच्या किंमतीला मिळणार कायद्याचे संरक्षण; अर्थमंत्र्यांचे मोठे आश्वासन
Corona Lockdown कोरोनाचे वेगळेच, लॉकडाऊनने घेतले शेकडो बळी; 91 जणांनी तर आत्महत्याच केली