CoronaVirus चिंताजनक! राज्यात कोरोनाग्रस्तांमध्ये विक्रमी वाढ; एकूण आकडा २५ हजार पार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 10:30 PM2020-05-13T22:30:59+5:302020-05-13T22:31:15+5:30
राज्यातील आजच्या एकूण मृत्यूंपैकी ४० मृत्यू हे एकट्या मुंबईतील आहेत. तर पुण्यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला आहे. आज दिवसभरात जवळपास दीड हजार रुग्ण सापडले असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.
दिवसभरात आज राज्यात 1495 नवे रुग्ण सापडले आहेत. तर ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आता पर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 25,922 वर पोहोचला असून एकूण ५५४७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. नव्या नियमांमुळे राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आज ४२२ रुग्णांना सोडण्यात आले.
राज्यातील आजच्या एकूण मृत्यूंपैकी ४० मृत्यू हे एकट्या मुंबईतील आहेत. तर पुण्यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जळगाव, सोलापूर आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी आणि वसई विरारमध्ये १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या....
खूशखबर! विशेष रेल्वे सेवा सुरु होणार; २२ मेपासून वेटिंग लिस्ट
मध्यम, कुटीर, लघु उद्योगासाठी तीन लाख कोटींचे विनातारण कर्ज; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा
बाबो! तब्बल दोन महिन्यांनी दुकाने, सिनेमा गृहे उघडली; अवस्था पाहून शॉक बसेल
रेडमीचे फोन पुन्हा महागले; दीड महिन्यांतील मोठी वाढ
सर्वसामान्य नोकरदारांना मोठा दिलासा; निर्मला सीतारामन यांच्याकडून मुदतवाढ
उद्या नाही, १५ मेपासून घरपोच दारू मिळणार; फक्त एकच मोठी अट