CoronaVirus News: राज्यात आतापर्यंत १३ लाख ६९ हजार रुग्ण कोरोनामुक्त, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 04:42 AM2020-10-19T04:42:34+5:302020-10-19T04:47:25+5:30

राज्यात दिवसभरात कोरोनाच्या ९,०६० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १५० मृत्यू झाले. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १५ लाख ९५ हजार ३८१ झाली असून बळींचा आकडा ४२,११५ झाला. सध्या राज्यात १ लाख ८२ हजार ९७३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

CoronaVirus Marathi News So far 13 lakh 69 thousand patients have been released from the corona in the state | CoronaVirus News: राज्यात आतापर्यंत १३ लाख ६९ हजार रुग्ण कोरोनामुक्त, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यांवर

CoronaVirus News: राज्यात आतापर्यंत १३ लाख ६९ हजार रुग्ण कोरोनामुक्त, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यांवर

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यांवरराज्यात दिवसभरात कोरोनाच्या ९,०६० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १५० मृत्यू झाले.सध्या राज्यात १ लाख ८२ हजार ९७३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


मुंबई : राज्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मागील काही आठवड्यांत दिवसभरात १० हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रविवारी ११,२०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १३ लाख ६९ हजार ८१० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.८६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यात दिवसभरात कोरोनाच्या ९,०६० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १५० मृत्यू झाले. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १५ लाख ९५ हजार ३८१ झाली असून बळींचा आकडा ४२,११५ झाला. सध्या राज्यात १ लाख ८२ हजार ९७३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात २४ लाख १२ हजार ९२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात, तर २३ हजार ३८४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यांवर 
राज्यासह मुंबईतही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यांवर गेला आहे. कोविडमुक्त रुग्णांचा दर ८७ टक्के असून २ लाख १० हजार ७८२ रुग्ण बरे झाले. रविवारी कोरोनाचे १,६०० रुग्ण आढळले असून ४६ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची संख्या २ लाख ४१ हजार ९३५ असून बळींचा आकडा ९,७८५ आहे. 

च्मुंबईत रविवारी कोरोनाच्या १,६०० रुग्णांचे निदान झाले असून ४६ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोविडबाधितांची संख्या २ लाख ४१ हजार ९३५ वर गेली असून बळींचा आकडा ९,७८५ झाला आहे. ११ ते १७ ऑक्टोबर दरम्यान मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.७७ टक्के नोंदविण्यात आला.

 

Web Title: CoronaVirus Marathi News So far 13 lakh 69 thousand patients have been released from the corona in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.