CoronaVirus बापरे! राज्यातील नव्या रुग्णांच्या संख्येत मुंबईचा मोठा वाटा; दिवसभरात ३४ बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 09:14 PM2020-05-05T21:14:14+5:302020-05-05T21:19:24+5:30
देशात कोरोनाचे एकूण ४६४३३ रुग्ण झाले असून गेल्या २४ तासांतील आकडा चिंता वाढविणारा आहे.
मुंबई : आज दिवसभरातील देशातील कोरोना ग्रस्तांचा आकडा भीतीदायक असताना मुंबईतूनही रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. त्यातच आज मुंबईत दिवसभरात ६३५ नवे कोरोनाग्रस्त सापडले असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा उर्वरित राज्याच्या आजच्या आकडेवारीच्या तिप्पट असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरीसह राज्यभरात मुंबईहून गेलेले कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.
देशात कोरोनाचे एकूण ४६४३३ रुग्ण झाले असून गेल्या २४ तासांतील आकडा चिंता वाढविणारा आहे. या काळात देशभरात ३९०० नवीन रुग्ण सापडले आहेत. तर १०२० रुग्ण बरे झाले आहेत. धक्कादायक म्हणजे आज सर्वाधिक १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांची सरासरी वाढली असून ती 27.41% झाली आहे.
तर राज्यात आज दिवसभरात ८४१ रुग्णांचे निदान झाले असून एकूण १५ हजार ५२५ रुग्ण झाले आहेत. तर ३४ जणांचा आज मृत्यू झाला असून एकूण आकडा ६१७ वर गेला आहे. राज्यभरातून ३५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण २८१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईनेही झोप उडविली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण एकट्या मुंबईमध्ये सापडत आहेत. मुंबईत आज दिवसभरात ४०६ जणांना संभाव्य कोरोनाबाधित म्हणून भरती करण्यात आले आहे. तर आज ६३५ रुग्ण सापडले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २२० असून एकूण २१२८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. मृतांची संख्या २६ झाली असून आजपर्यंतचा मुंबईतील बळींचा आकडा ३८७ वर गेला आहे.
महत्वाच्या बातम्या...
चिंताजनक! मुंबईवर कोरोनाचे वाढते संकट; दिवसभरात ६३५ नवे कोरोनाग्रस्त
CoronaVirus धक्कादायक! आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना; सिंधुदुर्गात खळबळ
चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण
दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल