CoronaVirus News: चिंताजनक! राज्यात 24 तासांत 2200हून अधिक नवे कोरोनाबाधीत; रुग्णांची संख्या 40 हजारच्या जवळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 10:10 PM2020-05-20T22:10:42+5:302020-05-20T22:44:07+5:30
आतापर्यंत एकूण 10318 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. तर आता राज्यात एकूण 27581 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1390 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज राज्यात 2250 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकड आता 39297वर पोहोचला आहे. याच बरोबर आज नवे 679 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 10318 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. तर आता राज्यात एकूण 27581 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1390 जणांचा मृत्यू झाला आहे.
The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 39297. Today,newly 2250 patients have been identified as positive. Also newly 679 patients have been cured today,totally 10318 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 27581.
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 20, 2020
चीनची धमकी! आता अमेरिकेने परिणाम भोगायला तयार रहावे
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे गेल्या 24 तासांत 1372 नवे रुग्ण आढळले, तर 41 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा आता 24 हजारच्याही पुढे गेला आहे. तर आतापर्यंत जवळपास 840 जणांचा मृत्यू झाला आहे.
यापूर्वी, महाराष्ट्रात मंगळवारी 2 हजार 127 नवे कोरोनाबाधित सापडले होते. तर 76 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच मुंबईत 1411 नवे रुग्ण समोर आले होते, तर 43 जणांचा मृत्यू झाला होता.
पुणे विभागातील कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार ३४७ -
पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५ हजार ३४७ झाली असून विभागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २६५ वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत विभागातील २ हजार ४७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजार ६०७ असून १८७ रुग्ण गंभीर आहेत तर उर्वरित रुग्ण निगराणीखाली आहेत.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ हजार ५२५, २ हजार ११४ अॅक्टिव्ह रुग्ण -
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ५२५ झाली आहे. तर जिल्ह्यातील २ हजार १८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात २ हजार ११४ अॅक्टिव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात १७८ रुग्ण गंभीर असून उर्वरित निगराणीखाली आहेत.
CoronaVirus News: बापरे! कोरोनाचे नियम तोडले तर 'हा' मुस्लीम देश देणार जगातील सर्वात मोठी शिक्षा