CoronaVirus News: चिंताजनक! महाराष्ट्रात आज 8369 नवे कोरोनाबाधित, 246 जणांनाचा मृत्यू; अशी आहे मुंबईची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 09:47 PM2020-07-21T21:47:48+5:302020-07-21T22:02:04+5:30

आज राज्यात तब्बल 8 हजार 369 नवे कोरोनाबाधित समोर आले असून 246 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

CoronaVirus Marathi News Today newly 8369 patients have been tested as COVID19 positive says rajesh tope | CoronaVirus News: चिंताजनक! महाराष्ट्रात आज 8369 नवे कोरोनाबाधित, 246 जणांनाचा मृत्यू; अशी आहे मुंबईची स्थिती

CoronaVirus News: चिंताजनक! महाराष्ट्रात आज 8369 नवे कोरोनाबाधित, 246 जणांनाचा मृत्यू; अशी आहे मुंबईची स्थिती

Next
ठळक मुद्देआज 7 हजार 188 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 1 लाख 82 हजार 217 झाली आहे.सध्या राज्यात एकूण 1 लाख 32 हजार 236 रुग्ण सक्रिय.


मुंबई - देशात कोरोना व्हायरसने हाहाकार घातला आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. आज राज्यात तब्बल 8 हजार 369 नवे कोरोनाबाधित समोर आले असून 246 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय आज 7 हजार 188 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. आज राज्यात 8 हजार 369 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 3 लाख 27 हजार 031 वर पोहोला आहे. तर आज एकूण 7 हजार 188 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 1 लाख 82 हजार 217 झाली आहे. सध्या राज्यात एकूण 1 लाख 32 हजार 236 रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे टोपे यांनी सांगितले आहे.

मुंबईत 995 नवे रुग्ण, 62 जणांचा मृत्यू -
मुंबईत आज तब्बल 995 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 905 जण ठणठणीत होऊन घरीही गेले आहेत. शहरातील एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा आता 1 लाख 3 हजार 262 वर पोहोचला आहे. यांपैकी सध्या 23,893 रुग्ण सक्रिय आहेत. तर तब्बल 73 हजार 555 लोक बरे झाले आहेत आणि 5 हजार 814 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या राज्यात 7 लाख 79 हजार 676 जण होम क्वारंटाइन आहेत. तर 45 हजार 77 जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

देशात 24 तासांत 37 हजार 148 रुग्ण - 
देशात गेल्या 24 तासांत तब्बल 37,148 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 587 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

अमरनाथ यात्रा रद्द -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अमरनाथ यात्रा रद्द (Amarnath Yatra 2020 Cancelled) करण्यात आली आहे. यंदा 21 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात येईल, असे म्हटलं जात होते. तशी शक्यता वर्तवण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी 'प्रथम पुजे'चे आयोजनही करण्यात आले होते. मात्र अचानक अमरनाथ श्राईन बोर्डाच्या (एमएसबी) अधिकाऱ्यांनी यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. दरवर्षी जून महिन्यात अमरनाथ यात्रेला सुरुवात होते.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : अमेरिकेनं तयार केली कोरोनावरील व्हॅक्सीन? ट्रम्प यांचा मोठा दावा!

'या' वर्षी कोरोना लस येणार का?; खुद्द ऑक्सफर्डच्या डेव्हलपर्सनी दिले मोठे 'अपडेट'

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?

आई शप्पथ!...रशियातील काही उद्योगपती, नेत्यांनी एप्रिलमध्येच घेतली कोरोनावरील लस

बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

Web Title: CoronaVirus Marathi News Today newly 8369 patients have been tested as COVID19 positive says rajesh tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.