CoronaVirus News : अरे व्वा! दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 09:01 PM2020-09-30T21:01:04+5:302020-09-30T21:02:51+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: आज दिवसभरात १८ हजार ३१७ नविन रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार १६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
मुंबई - राज्यात दररोज बरे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांच्या पुढे असून सलग तिसऱ्यांदा नवीन रुग्ण कमी संख्येने नोंदविले गेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यात उपचाराखाली असलेल्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमीकमी होत आहे. आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार १६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.६१ टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ लाख ८५ हजार २०५ नमुन्यांपैकी १३ लाख ८४ हजार ४४६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.४० टक्के) आले आहेत. राज्यात २१ लाख ६१ हजार ४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार १७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४८१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Maharashtra reports 18,317 new #COVID19 cases, 481 deaths and 19,163 discharges today. Total cases in the state rise to 13,84,446, including 36,662 deaths and 10,88,322 discharges. Active cases stand at 2,59,033: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/KBsWa20pJu
— ANI (@ANI) September 30, 2020
आज निदान झालेले १४,९७६ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४३० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२६५४ (४६), ठाणे- ३२० (८), ठाणे मनपा-४७३ (३६), नवी मुंबई मनपा-४५२ (४), कल्याण डोंबिवली मनपा-५२७ (११), उल्हासनगर मनपा-४० (१), भिवंडी निजामपूर मनपा-३१ (४), मीरा भाईंदर मनपा-२३९ (९), पालघर-१७१ (१२), वसई-विरार मनपा-२४२ (३०), रायगड-३३६ (७), पनवेल मनपा-२५८ (१), नाशिक-४६५ (६), नाशिक मनपा-८९३ (१५), मालेगाव मनपा-३३ (१), अहमदनगर-६३९ (७), अहमदनगर मनपा-१२५ (५), धुळे-६१, धुळे मनपा-६६, जळगाव-२५३ (१), जळगाव मनपा-१०६, नंदूरबार-४० (१), पुणे- ११७९ (२१), पुणे मनपा-१३७० (२८), पिंपरी चिंचवड मनपा-७१२ (३१), सोलापूर-३६८ (५), सोलापूर मनपा-६४, सातारा-६०१ (२९), कोल्हापूर-३३९ (१५), कोल्हापूर मनपा-९१ (५), सांगली-४११ (१८), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४९ (५), सिंधुदूर्ग-५४ (२), रत्नागिरी-११७ (१३), औरंगाबाद-१२७ (७),औरंगाबाद मनपा-१९६ (१), जालना-१३४, हिंगोली-२८, परभणी-६२ (७), परभणी मनपा-२६ (१), लातूर-११६ (७), लातूर मनपा-९३ (१), उस्मानाबाद-२५६ (११), बीड-२१४ (३), नांदेड-१३६ (७), नांदेड मनपा-७१ (१), अकोला-२२ (५), अकोला मनपा-५२ (३), अमरावती-८३ (१), अमरावती मनपा-९७, यवतमाळ-१६२ (३), बुलढाणा-२४३ (९), वाशिम-१५० (९), नागपूर-३१३ (९), नागपूर मनपा-१०३८ (१४), वर्धा-१२७, भंडारा-१५५ (१), गोंदिया-१७७ (२), चंद्रपूर-२२५ (१), चंद्रपूर मनपा-१४३, गडचिरोली-६९, इतर राज्य-२३ (१).
CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार!https://t.co/zsQCpp0DCd#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) September 30, 2020